मेलबर्न। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात आज तिसरा आणि शेवटचा वनडे सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर सुरु झाला आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा डाव 48.4 षटकात 230 धावांवर संपूष्टात आला आहे. भारताकडून फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलने सर्वोत्तम गोलंदाजी करताना 6 विकेट्स घेतल्या आहेत.
याबरोबरच चहल ऑस्ट्रेलियामध्ये एका वनडे सामन्यात 6 विकेट्स घेणारा भारताचा पहिलाच फिरकी गोलंदाज ठरला आहे. त्याने या सामन्यात 10 षटकात 42 धावा देत 6 विकेट्स घेतल्या आहेत.
याआधी ऑस्ट्रेलियामध्ये एका वनडे सामन्यात भारतीय फिरकी गोलंदाजाने सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम रवी शास्त्री यांच्या नावावर होता. त्यांनी 8 डिसेंबर 1991 ला पर्थमध्ये 15 धावांत 5 विकेट्स घेतल्या होत्या.
तसेच चहल हा ऑस्ट्रेलियामध्ये एका वनडे सामन्यात 5 किंवा त्यापेक्षा जास्त विकेट्स घेणारा भारताचा एकूण तिसरा गोलंदाज ठरला आहे. याआधी शास्त्री आणि अजित अगरकरने असा पराक्रम केला आहे.
याबरोबरच ऑस्ट्रेलियामध्ये वनडेत एका सामन्यात सहा विकेट्स घेणारा चहल जगातील केवळ चौथा तर भारताचा दुसरा गोलंदाज ठरला आहे.
याआधी भारताकडून अजित अगरकरने मेलबर्नमध्ये 2004 मध्ये 6 विकेट्स घेतल्या होत्या. तसेच ऑस्ट्रेलियाचा मिशेल स्टार्क आणि इंग्लंडचा ख्रिस वोक्स या गोलंदाजांनीही ऑस्ट्रेलियामध्ये एका वनडे सामन्यात 6 विकेट्स घेण्याचा विक्रम केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–इंग्लंड, श्रीलंकेप्रमाणेच ऑस्ट्रेलिया विरुद्धही धोनीने केला तो मोठा कारनामा
–भारताकडून आज वनडे पदार्पण करणारा कोण आहे विजय शंकर…
–रणजी ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत या संघाने केला पहिल्यांदाच प्रवेश