रविवारी (३ ऑक्टोबर) आयपीएल २०२१ मध्ये पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात सामना खेळला गेला. आरसीबीचा ग्लेन मॅक्सवेलने या सामन्यात शानदार अर्धशतक झळकावले. त्याने ३३ चेंडूत ५७ धावा केल्या. मॅक्सवेलने आपल्या खेळीत ४ षटकार आणि ३ चौकार मारले. मॅक्सवेलच्या डावाच्या आधारे आरसीबीने १६४ धावा केल्या, त्यानंतर पंजाब किंग्सचा संघ २० षटकांत ६ विकेटवर १५८ धावाच करू शकला आणि त्यामुळे पंजाबला ६ धावांनी पराभव पत्करावा लागला. या विजयासह आरसीबी आयपीएलच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्यात यशस्वी झाला आहे.
आरसीबीच्या या विजयात मॅक्सवेलची खेळी महत्त्वपूर्ण होता, तर दुसरीकडे युझवेंद्र चहलने आपली फिरकीची जादू दाखवून ३ महत्त्वाच्या विकेट घेतल्या. चहलने मयांक अगरवाल, निकोलस पूरन आणि सरफराज खानला बाद करत पंजाबला पिछाडीवर टाकले. विशेषत: चहलने ज्या प्रकारे सरफराजला त्रिफळाचीत केले ते अद्भुत होते.
चहलने सरफराजला १६ व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर अद्भुत असे त्रिफळाचीत केले. बाद झाल्यावर सरफराज बऱ्याच वेळपर्यंत आश्चर्यचकित होता, तो त्याच्या स्टंपकडे पाहत होता. चहलचा हा चेंडू आयपीएल २०२१ चा सर्वोत्तम चेंडू मानला जात आहे. आता चहलने आयपीएलमध्ये अशी जबरदस्त गोलंदाजी केली आहे, त्यामुळे टी -२० विश्वचषकासाठी निवडकर्ते पुन्हा चहलचा संघात समावेश करतील अशी अपेक्षा आहे.
— Cricsphere (@Cricsphere) October 3, 2021
याशिवाय पंजाबला पराभवाला सामोरे जावे लागले असले तरी केएल राहुलने एक विशेष विक्रम आपल्या नावावर केला आहे. राहुलने सलग चौथ्या आयपीएल हंगामात ५०० हून अधिक धावा करण्याचा पराक्रम केला आहे. त्याने ख्रिस गेलचा विक्रम मोडला आहे. गेलने आयपीएलच्या इतिहासात सलग ३ हंगामात ५०० किंवा त्यापेक्षा जास्त धावा केल्या होत्या. केएल राहुलने या मोसमात आतापर्यंत एकूण ५२८ धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
युएईमध्ये चालली चहलच्या फिरकीची जादू; बुमराहच्या विक्रमाची केली बरोबरी
तोंडचा घास हिरावला पावसाने, पण तरीही भारतीय महिला संघाने याबाबतीत घडवला इतिहास
दिसतोय का रे! मॅक्सीचा गगनचुंबी षटकार गेला स्टेडिअमच्या बाहेर; पाहून तुमचेही चक्रावतील डोळे