भारत आणि इंग्लंड या दोन संघांमध्ये सुरू असलेल्या मालिकेतील दुसरा एकदिवसीय सामना गुरुवार १४ जुलै रोजी क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लॉर्डसच्या मैदानावर खेळवला गेला. या सामन्यात इंग्लंडच्या संघाने भारतीय संघाला तब्बल १०० धावांनी पराभूत केले. मात्र, या सामन्यात भारतीय फिरकीपटू युझवेंद्र चहल याने आपल्या नावे विक्रम नोंदवला.
लॉर्ड्सवर ३ सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलने यजमान इंग्लंडविरुद्ध शानदार गोलंदाजी करत इतिहास रचला. चहलने १० षटकात ४७ धावा देत ४ बळी घेत ३९ वर्षांचा जुना विक्रम मोडला.
खरं तर, चहल लॉर्ड्सवर वनडे क्रिकेटमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणारा भारतीय गोलंदाज बनला आहे. त्याने माजी भारतीय क्रिकेटपटू मोहिंदर अमरनाथचा विक्रम मोडला. अमरनाथने १९८३ च्या विश्वचषकात केवळ १२ धावांत ३ बळी घेतले होते. आता चहल लॉर्ड्सवर ४ बळी घेणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे.
लॉर्ड्सवर भारतासाठी सर्वोत्तम एकदिवसीय गोलंदाजीची आकडेवारी
युझवेंद्र चहल (४/४७) – २०२२
मोहिंदर अमरनाथ (३/१२) – १९८३
आशिष नेहरा (३/२६) – २००४
हरभजन सिंग (३/२८) – २००४
मदन लाल (३/३१) – १९८३
या सामन्यात युझवेंद्र चहल याने केवळ ४७ धावा देत ४ बळी घेतले. यामध्ये इंग्लंडचा सलामीवीर जॉनी बेअरस्टो,जो रुट, बेन स्टोक्स आणि मोईन अली या फलंदाजांचा समावेश होता. चहललने सामन्याच्या प्रत्येक वळणावर भारताला बळी मिळवून देत इंग्लंडला केवळ २४६ धावांवर रोखण्यात यश मिळवले होते.
A fantastic spell (4-47) from @yuzi_chahal comes to an end and he gets an applause here at the Lord's.👏
Jonny Bairstow ✔️
Joe Root✔️
Ben Stokes✔️
Moeen Ali✔️https://t.co/N4iVtxsQDF #ENGvIND pic.twitter.com/VoN6FwdWOG— BCCI (@BCCI) July 14, 2022
दरम्यान, इंग्लंड आणि भारत या दोन्ही संघांमधील तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना रविवारी १७ जुलै रोजी खेळवला जाईल. सध्या या मालिकेत दोन्ही संघ १-१च्या बरोबरीवर आहेत. त्यामुळे शेवटच्या सामन्यात दोन्ही संघ मालिका काबीज करण्याच्या हेतूने खेळायला उतरतील. यामुळे शेवटचा सामना आणखी रोंमांचक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
भारताचे माजी दिग्गज क्रिकेटच्या पंढरीत एकवटले! धोनी अन् रैनाच्या फोटोंनी वेधले लक्ष
रोहित अन् विराटची यारी, जगात भारी! भारतीय कर्णधाराने पुन्हा एकदा केली किंग कोहलीची पाठराखण
इशान किशन धापकन तोंडावर आपटला, पण खेळाडू सांत्वना द्यायची सोडून हसत बसले! Video