फिरकीपटू युजवेंद्र चहलनं आयपीएलमध्ये इतिहास रचला आहे. चहल आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज असून आता त्यानं बळींचं द्विशतक पूर्ण केलंय. चहलनं मुंबई इंडियन्स विरुद्ध मोहम्मद नबीचा त्याच्याच गोलंदाजीत झेल घेत आयपीएलमध्ये 200 बळी पूर्ण केले.
युजवेंद्र चहल मुंबई इंडियन्सच्या डावाचं आठवं षटक टाकण्यासाठी आला होता. या षटकातील तिसऱ्या चेंडूवर त्यानं मोहम्मद नबीचा झेल घेत त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. चहलनं ऑफ स्टंपवर लेग ब्रेक बॉल टाकला, जो नबीनं ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र चेंडू बॅटच्या काठाला लागून चहलच्या हातात गेला. झेल घेतल्यानंतर चहलनं आपले दोन्ही गुडघे जमिनीवर टेकवले आणि आकाशाकडे पाहून सेलिब्रेशन केलं.
युजवेंद्र चहलनं आयपीएलच्या अवघ्या 153 सामन्यांमध्ये ही कामगिरी केली आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत ड्वेन ब्राव्होचं नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे. ब्राव्होनं 161 सामन्यात 183 बळी घेतले आहेत. ब्राव्होला इथपर्यंत पोहोचण्यासाठी 14 वर्षे लागली. परंतु चहल केवळ 11 वर्षांमध्ये ब्राव्होच्या बरंच पुढे गेला आहे. या लिस्टमध्ये तिसऱ्या क्रमांकावर पीयूष चावला आहे, ज्यानं 186 सामन्यांमध्ये 181 विकेट घेतल्या आहेत.
युजवेंद्र चहलनं 2013 मध्ये मुंबई इंडियन्सकडून आपल्या आयपीएल करिअरला सुरुवात केली होती. त्या हंगामात त्याला एकच सामना खेळण्याची संधी मिळाली होती, ज्यामध्ये त्यानं 34 धावा दिल्या होत्या. यानंतर त्यानं 2014 मध्ये 14 सामने खेळले, ज्यात त्यानं 12 विकेट घेतल्या. यानंतर चहलनं मागे वळून पाहिलं नाही.
युजवेंद्र चहलनं 2015 मध्ये 23, 2016 मध्ये 21, 2017 मध्ये 14, 2018 मध्ये 12, 2019 मध्ये 18, 2020 मध्ये 21, 2021 मध्ये 18, 2022 मध्ये 27 विकेट आणि गेल्या मोसमात 21 विकेट घेतल्या. तो आयपीएलच्या या हंगामातही तुफान फार्मात आहे. त्यानं आतापर्यंत खेळलेल्या 8 सामन्यांमध्ये 13 विकेट घेतल्या असून तो ‘पर्पल कॅप’च्या शर्यतीत आघाडीवर आहे. युजवेंद्र चहलचा आयपीएलमधील इकॉनॉमी रेट 7.69 असून सरासरी 31.39 आहे.
आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स
200 – युजवेंद्र चहल
183 – ड्वेन ब्राव्हो
181 – पियुष चावला
174 – भुवनेश्वर कुमार
173 – अमित मिश्रा
बातमी अपडेट होत आहे
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएल 2024 चा सिक्सर किंग कोण? कोणी लगावलाय सर्वात लांब षटकार? जाणून घ्या टॉप-5 फलंदाज
बाद झाल्यानंतर अंपायरशी वाद घालणं पडलं महागात, विराट कोहलीला बीसीसीआयनं ठोठावला मोठा दंड
मैदानावर कुणी घेतला रोहित शर्माचा मुका? ‘हिटमॅन’नं पुढे काय केलं? पाहा VIDEO