बंगळुरू येथे १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी आयपीएल २०२२ चा मेगा लिलाव पार पडला. या लिलावात गुजरात जायंट्स आणि लखनऊ सुपर जायंट्स हे २ नवे संघ उतरल्याने खेळाडूंना विकत घेण्यासाठी संघांमध्ये चांगलीच स्पर्धा पाहायला मिळाली. त्यातही भारताचा अनुभवी फिरकीपटू युझवेंद्र चहल याला विकत घेण्यासाठी ४ संघ स्पर्धेत होते. अखेर राजस्थान रॉयल्सने त्याला आपल्या ताफ्यात सामाविष्ट केले आहे.
चहलला विकत घेण्यासाठी मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स, सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्समध्ये लढत पाहायला मिळाली. अखेर ६.५ कोटी मोजत राजस्थान रॉयल्सने त्याला विकत घेतले आहे.
.@yuzi_chahal all set to play for @rajasthanroyals – RR fans how happy are you with this pick?#TATAIPLAuction @TataCompanies pic.twitter.com/UZfOc4Setn
— IndianPremierLeague (@IPL) February 12, 2022
यापूर्वी चहल विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून खेळला आहे. तो बेंगलोरकडून १०० पेक्षा जास्त सामने खेळणारा गोलंदाज आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरव्यतिरिक्त तो मुंबई इंडियन्सकडून खेळला आहे. त्यामुळे आता राजस्थान हा तो आयपीएलमध्ये प्रतिनिधित्त्व करणारा तिसरा संघ असेल. चहलने आतापर्यंत आयपीएलमध्ये ११४ सामने खेळले असून १३९ विकेट्स घेतल्या आहेत.
कुलदीप यादव दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यात
दुसरीकडे युझवेंद्र चहलचा मित्र आणि भारताचा फिरकीपटू कुलदिप यादव याला दिल्ली कॅपिटल्सने २ कोटींना विकत घेतले आहे. तो गतवर्षी कोलकाता नाईट रायडर्स संघाचा भाग होता. त्याने आतापर्यंत आयपीएलमध्ये ४५ सामने खेळताना ४० विकेट्स घेतल्या आहेत. परंतु त्याला आयपीएल २०२१ मध्ये जास्त सामने खेळण्याची संधी मिळाली नव्हती. त्यामुळे यंदा दिल्लीचा संघ तरी त्याला खेळवेल की पूर्ण हंगाम बाकावर बसवून ठेवेल, हे पाहावे लागेल.
महत्त्वाच्या बातम्या-
मोठ्या वादानंतर कृणाल आणि हुडा पुन्हा खेळणार एकाच संघात ! सोशलमीडियावर उमटल्या अशा प्रतिक्रिया
‘गेले दोन महिने माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण दिवस’, श्रेयस अय्यरने मांडली व्यथा