कोलकाता। भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात (India vs West Indies) सध्या टी२० मालिका (T20I Series) सुरू आहे. ही मालिका कोलकातामधील इडन गार्डन येथे होत आहे. या टी२० मालिकेतील अखेरचा सामना रविवारी (२० फेब्रुवारी) होणार आहे. या सामन्यात भारताचा अनुभवी फिरकीपटू युजवेंद्र चहल याला (Yuzvendra Chahal) मोठा विक्रम करण्याची संधी असणार आहे.
बुमराहला पछाडणार चहल
वेस्ट इंडिज विरुद्ध होणाऱ्या तिसऱ्या टी२० सामन्यादरम्यान चहलकडे भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याला (Jasprit Bumrah) मागे टाकण्याची संधी असणार आहे. चहल बुमराहला पछाडत भारताचा सर्वात यशस्वी टी२० गोलंदाज होऊ शकतो. चहलला या सामन्यासाठी भारताच्या अंतिम ११ जणांच्या संघात संधी मिळाली आणि त्याने किमान एक जरी विकेट घेतली, तरी तो भारताकडून सर्वाधिक टी२० विकेट्स घेणारा गोलंदाज ठरू शकतो.
असे झाल्यास युजवेंद्र चहल आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा भारतीय गोलंदाज ठरेल आणि जसप्रीत बुमराहला मागे टाकेल (Most T20I Wickets for India).
सध्या आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम जसप्रीत बुमराह आणि युजवेंद्र चहल यांच्या नावावर संयुक्तरित्या आहे. बुमराहने ५५ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांत ६६ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच युजवेंद्र चहलने ५२ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांत ६६ विकेट्स घेतल्या आहेत. तर या यादीत तिसऱ्या क्रमांकावर ६१ विकेट्ससह आर अश्विन आहे.
दरम्यान, महत्त्वाची गोष्ट अशी की, जसप्रीत बुमराह दोघेही वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी भारतीय संघाचा भाग नाहीत. त्याचमुळे युजवेंद्र चहलकडे सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी२० विकेट्स घेणारा भारतीय गोलंदाज बनण्याची उत्तम संधी आहे. आता ही संधी युजवेंद्र चहल साधणार का, हे पाहावे लागणार आहे.
आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे भारतीय गोलंदाज (१९ फेब्रुवारी २०२२ पर्यंत)
६६ विकेट्स – जसप्रीत बुमराह (५५ सामने)
६६ विकेट्स – युजवेंद्र चहल (५२ सामने)
६१ विकेट्स – आर अश्विन (५१ सामने)
५५ विकेट्स – भुवनेश्वर कुमार (५७ सामने)
४६ विकेट्स – रविंद्र जडेजा (५५ सामने)
वेस्ट इंडिज विरुद्धच्या तिसऱ्या टी२० सामन्यासाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, इशान किशन (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, वेंकटेश अय्यर, दीपक चाहर, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, रवी बिश्नोई, युझवेंद्र चहल, दीपक हुडा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आवेश खान.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएल लिलावात बोली लागली नाही, पण टीम इंडियात एंट्री करणारा कोण आहे सौरभ कुमार?
विराट-पंतच्या अनुपस्थितीत तिसऱ्या टी२० साठी ‘अशी’ असू शकते टीम इंडियाची प्लेईंग इलेव्हन
केव्हा, कुठे आणि कधी पाहू शकाल भारत- वेस्ट इंडिज तिसरा टी२० सामना? जाणून घ्या एका क्लिकवर