---Advertisement---

चहलने केले ईश सोधीला चेकमेट

---Advertisement---

भारताचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलने त्याचे बुद्धिबळाचे कौशल्य दाखवून न्यूझीलँड गोलंदाज ईश सोधीला बुद्धिबळात चेकमेट केले. भारतीय संघ आणि न्यूझीलंड संघ तिसऱ्या टी २० निमित्त तिरुअनंतपुरमला प्रवास करत असताना प्रवासात चहल आणि सोधी बुद्धिबळ खेळत होते. याबद्दल दोघांनीही ट्विट केले आहेत.

चहल हा क्रिकेटमध्ये येण्याआधी जुनिअर बुद्धिबळ चॅम्पियन होता. त्याने भारताचे आशिया आणि वर्ल्ड युथ चॅम्पिअनशिपमध्ये प्रतिनिधित्व केले आहे. परंतु पैशाची कमी आणि प्रायोजक नसल्याने त्याला हा खेळ सोडावा लागला.

या विषयी त्याचे वडील म्हणाले “बुद्धिबळासाठी त्याला वर्षाला ५० लाखांची गरज होती. परंतु आम्ही त्यासाठी प्रायोजक शोधू शकलो नाही त्यामुळे त्याला तो खेळ सोडावा लागला. सध्या तो त्याचा छंद म्हणून बुद्धिबळ खेळत असतो.”

चहलने ट्विटमध्ये त्याच्या आणि सोधीमध्ये झालेल्या बुद्धिबळाच्या बोर्डवरील अंतिम स्थानांचा फोटो पोस्ट केला आहे आणि लिहिले आहे की, “ईश सोधी तुझं नशीब आज चांगले नव्हते. पुढच्या खेळासाठी शुभेच्छा.”

यावर ईश सोधीचा संघासहकारी मॅट हेनरीने ट्विट केले आहे. त्यावर सोधी म्हणाला “आता सामन्याचा निकाल सर्वांसमोर आला आहे आणि मला मॅट हेनरी ही हार विसरू देणार नाही.”

यानंतर लगेचच सोधीने दुसरा फोटो पोस्ट केला आहे “परत दुसरा सामना झालेला आहे आणि खरंच चहल बुद्धिबळ चॅम्पियन आहे.” यावर चहलने त्याला सामन्याच्या निकालाचा ट्विट केला. तेव्हा सोधी त्याला म्हणाला “काळजी नको. प्रवास लांबचा आहे.”

यानंतर पुन्हा अजून एक ट्विट सोधीने हिंदीमध्ये केले आहे. “खेळ तिसऱ्या फेरीसाठी तयार आहे. चहल लवकर ये”

याबद्दल सोधीने सांगितले “आम्ही दोन सामने खेळलो आणि त्याने मला पूर्ण पराभूत केले. मला वाटलं नव्हतं तो इतका चतुर आहे. मी बचावात्मक खेळत होतो. आमच्यासाठी हे मजेदार होते”

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment