---Advertisement---

Video: राडा राडा! चालू सामन्यात चहल-सॅमसन पंचांशी भिडले, जाणून घ्या काय झाला वाद

On: सोमवार, एप्रिल 11, 2022 3:07 PM
Yuzvendra-Chahal
---Advertisement---

मुंबई। रविवारी (१० एप्रिल) वानखेडे स्टेडियमवर इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामातील २० वा सामना लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात पार पडला. या सामन्यात राजस्थानने ३ धावांनी विजय मिळवला. हा त्यांचा हंगामातील तिसरा विजय ठरला. या सामन्याचा सामनावीर पुरस्कार युजवेंद्र चहल याला मिळाला. त्याने या सामन्यात ४ विकेट्स घेण्याची कामगिरी केली. मात्र, याच सामन्यावेळी त्याच्यात आणि पंचांमध्ये वाद झाल्याचेही दिसले. 

पंचांबरोबर चहल, सॅमसनचा वाद
झाले असे की, लखनऊ संघ राजस्थानने दिलेल्या १६६ धावांच्या आव्हानाचा सामना करत होता. यावेळी १८ व्या षटकात युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) गोलंदाजीला आला. त्यावेळी लखनऊकडून मार्कस स्टॉयनिस आणि दुश्मंता चमिरा फलंदाजी करत होते. यावेळी पाचव्या चेंडूवर चमिराने स्लॉगस्विप मारण्याचा प्रयत्न केला. पण, त्याचा फटका बसला नाही आणि पंचांनी हा चेंडू वाईड घोषित केला.

मात्र, पंचांच्या या निर्णयावर चहल चकीत झाला आणि तो या वेळी पंचांची वाद करताना दिसला. त्यानंतर त्याला राजस्थानचा कर्णधार आणि यष्टीरक्षक संजू सॅमसन (Sanju Samson) याचीही साथ मिळाली. त्यानेही पंचांना या निर्णयाबद्दल प्रश्न विचारल्याचे दिसले. पंचही त्यांना समजावत होते.

खंरतर चहल साधारणत: शांत स्वभावासाठी ओळखला जातो. पण, सामन्यातील परिस्थिती पाहाता, त्याचा आणि सॅमसनचा राग अनावर झाला असल्याचा कयास लावला जात आहे. कारण शेवटच्या १४ चेंडूत लखनऊला ४१ धावांची गरज होती. दरम्यान, पंचांनी वाईड दिल्याने चहलला पाचवा चेंडू ज्यादाचा टाकावा लागला. विशेष म्हणजे या चेंडूवर त्याला चमिराची विकेटही मिळाली. त्यामुळे चहलले सामन्यातील चौथी आणि आयपीएल कारकिर्दीतील १५० वी विकेट घेण्याचा विक्रमी कारनामा देखील केला.

चहल आयपीएल २०२२ मध्ये २० सामन्यांनंतर सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज असल्याने सध्या पर्पल कॅप त्याच्याकडे आहे. त्याने आत्तापर्यंत ११ विकेट्स घेतल्या आहेत. या यादीत त्याच्यापाठोपाठ कुलदीप यादव असून त्याने १० विकेट्स घेतल्या आहेत (Yuzvendra Chahal loses his cool and yells at the umpire)

https://twitter.com/VaishnaviS45/status/1513213428881825792

राजस्थानने जिंकला सामना
या सामन्यात राजस्थानने २० षटकांत ६ बाद १६५ धावा केल्या. त्यांच्याकडून शिमरॉन हेटमायरने ३६ चेंडूत नाबाद ५९ धावा केल्या. तसेच लखनऊकडून कृष्णप्पा गॉथम आणि जेसन होल्डर यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तसेच राजस्थानने (LSG vs RR) दिलेल्या १६६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना लखनऊ संघाला २० षटकांत ८ बाद १६५ धावाच करता आल्या. त्यामुळे त्यांना ३ धावांनी पराभवाचा सामना करावा लागाला.

राजस्थानकडून युजवेंद्र चहलने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. तसेच अखेरच्या षटकात कुलदीप सेनने १५ धावांचे यशस्वी रक्षण करत राजस्थानच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. तसेच चहलने घेतलेल्या ४ विकेट्समुळे तो सामनावीर ठरला. दरम्यान, राजस्थानने या सामन्यात विजय मिळवल्याने ते गुणतालिकेत ६ गुणांसह अव्वल क्रमांकावर आले आहेत.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या – 

युजवेंद्र चहल १५० आयपीएल विकेट्स घेणारा सहावा गोलंदाज, जाणून घ्या अन्य ५ जणांची नावं

Video : आऊट नसताना दोनदा Out दिला आणि जेव्हा खरंच Out होता तेव्हा रहाणेनी ‘चिटींग’ केली

रिटायर्ड आऊट म्हणजे काय रे भावा? आर अश्विनने आयपीएलमध्ये असेच बाद होत घडवलाय इतिहास

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---