भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात येत्या काही दिवसांमध्ये ५ सामन्यांची टी२० मालिका खेळली जाणार आहे. ९ जून ते १९ जून, या कालावधीत ही मालिका होणार आहे. या मालिकेतून भारताचा अनुभवी फिरकीपटू युझवेंद्र चहल याचे भारतीय संघात पुनरागमन होणार आहे. पुनरागमनात धमाकेदार प्रदर्शन करत चहल मोठा विक्रम आपल्या नावावर करू शकतो. चहल अश्विनचा भारताकडून टी२० क्रिकेटमध्ये (ट्वेंटी ट्वेंटी) सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम मोडू शकतो.
चहल (Yuzvendra Chahal) दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० मालिकेदरम्यान (T20 Series) ३ विकेट्स घेताच अश्विनला (R Ashwin) पछाडत टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा भारतीय गोलंदाज (Most Wickets In T20 For India) बनू शकतो. या मालिकेत ५ टी२० सामने खेळले जाणार असल्याने चहलकडे या विक्रमाला गवसणी घालण्याची संधी आहे. चहल सध्या २४२ टी२० सामन्यांमध्ये २७४ विकेट्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहे. यामध्ये ५४ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांमधील ६८ विकेट्सचा समावेश आहे. तसेच त्याने हरियाणा संघाकडून देशांतर्गत क्रिकेटमध्ये टी२० सामने खेळताना ४० विकेट्स घेतल्या आहे. तर अश्विनच्या खात्यात २८२ टी२० सामन्यांमध्ये सर्वाधिक २७६ विकेट्सची नोंद आहे.
आयपीएल २०२२मध्ये पर्पल कॅप विजेता राहिलाय चहल
चहल सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. त्याने काही दिवसांपूर्वी झालेल्या आयपीएलच्या १५व्या हंगामात सर्वाधिक विकेट्स घेत पर्पल कॅप जिंकली आहे. राजस्थान रॉयल्सचे प्रतिनिधित्त्व करताना त्याने १७ सामन्यांमध्ये गोलंदाजी करत २७ विकेट्स घेतल्या आहेत. यासह तो या हंगामात सर्वात जास्त विकेट्स गोलंदाज राहिला.
४ महिन्यांनंतर चहल करणार पुनरागमन
चहल दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० मालिकेतून भारतीय संघात पुनरागमन करू शकतो. त्याने २६ फेब्रुवारी २०२२ ला श्रीलंकाविरुद्ध शेवटचा टी२० सामना खेळला होता. हाच त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामनाही राहिला आहे. अशात आता ४ महिन्यांच्या अंतरानंतर भारतीय संघात पुनरागमन करत आपले संघातील स्थान पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न चहल करताना दिसेल.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ: केएल राहुल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, इशान किशन, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, रिषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, व्यंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक
महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अरेरे! आझमच्या पाकिस्तान संघावर ओढावू शकते वनडे विश्वचषक न खेळताच बाहेर होण्याची नामुष्की
‘बायकोला कुठं सोडू?’, बसमध्ये चल म्हणणाऱ्या नेहराला चहलचे प्रत्युत्तर; एकदा पाहाच