भारताचा फिरकीपटू युझवेंद्र चहल नेहमीच आपल्या वेगवेगळ्या गोष्टींमुळे चर्चेत राहत असतो. कधी मैदानावर झोपण्याची स्टाईल असो, किंवा कधी रील्सवर घातलेला धुमाकूळ. आता सुद्धा चहल चर्चेत आला आहे. मात्र, यावेळी कारण आहे त्याच्या नव्या हेअरस्टाईलचे. आयपीएलमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन केल्यानंतर चहल आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० मालिकेत भारताकडून खेळताना दिसणार आहे. त्याआधी चहलने प्रसिद्ध हेअरस्टाईलिस्टला गाठून नवी हेअरस्टाईल करून घेतली आहे.
प्रसिद्ध हेअरस्टायलिस्ट आलिम हकीमने त्यांचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये चहल एका नव्या लूकमध्ये दिसत आहे. चहलचा हा फोटो शेअर करत आलिम हकीमने त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, “आमच्या @yuzi_chahal23 साठी विशेष फ्रेश समर कट.” आलिम हकीम बॉलिवूडमधील सेलिब्रिटी हेअरस्टायलिस्ट म्हणून ओळखला जातो. भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीही केस कापण्यासाठी हकीमकडे जातो.
https://www.instagram.com/p/CeVTU8bLDkL/?utm_source=ig_web_copy_link
आयपीएल २०२२ संपल्यानंतर आफ्रिकेच्या संघाविरुद्धच्या सामन्यापूर्वी खेळाडूंना थोडी विश्रांती देण्यात आली आहे. आफ्रिका संघाविरुद्धच्या सामन्यासाठी चहलचाही भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. या सामन्यात येण्यापूर्वी त्याने नवा लूक स्वीकारला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा चहल चर्चेत आला आहे.
नुकत्याच पार पडलेल्या आयपीएलमध्ये चहलने आपली चमक दाखवली आहे. याच कारणाने त्याला भारतीय संघात पुनरागमनाची संधी मिळाली आहे. आता चहल या संधीचे सोने करत भारतीय संघातील आपले स्थान मजबूत करतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, आयपीएलच्या नुकत्याच संपलेल्या १५व्या हंगामात चहलने फलंदाजांच्या नाकी नऊ आणले होते. त्याने आयपीएल २०२२मध्ये राजस्थान रॉयल्स संघासाठी संपूर्ण हंगामात एकूण ६८ षटके टाकली. यादरम्यान त्याने ५२७ धावा देत एकूण २७ विकेट घेतल्या. एवढेच नाही, तर आयपीएलच्या १५व्या हंगामात सर्वाधिक विकेट घेणारा तो अव्वल खेळाडू ठरला. या हंगामात सर्वाधिक यश बळी घतल्याने चहल पर्पल कॅपचा मानकरी ठरला.
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘हम करे तो साला कॅरेक्टर ढिला हैं’, असे म्हणत भारतीय क्रिकेटरचा इंग्लंडवर निशाणा
भाजप नेत्याचा मोठा आरोप; म्हणाले, ‘IPL निकालात मोठी गडबड, समिती नेमली पाहिजे’
रोहितच्या बालपणीच्या प्रशिक्षकांचा विराटला पाठिंबा; म्हणाले, ‘गावसकर अन् रिचर्ड्सप्रमाणे कोहलीही…’