---Advertisement---

आशिया कपसाठी निवड न झाल्याने चहल नाराज, ट्विट करत दिली प्रतिक्रिया

On: सोमवार, ऑगस्ट 21, 2023 5:44 PM
---Advertisement---

आशिया चषक 2023 साठी भारतीय संघाची आहे. सोमवारी (21 ऑगस्ट) कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांनी निवडलेला संघ पत्रकार परिषद घेऊन घोषित केला गेला. भारताचे सर्व प्रमुख खेळाडू आशिया चषकासाठी संघात पुनरागमन करणार आहेत. मात्र, फिरकीपटू युजवेंद्र चहल याला या संघात स्थान मिळवण्यात अपयश आले. त्यानंतर त्याने एक ट्विट करत आपली नाराजी व्यक्त केली.

आशिया चषकासाठी निवडलेल्या 17 सदस्यीय संघात फिरकी गोलंदाज म्हणून कुलदीप यादव याचा समावेश केला गेला आहे. त्याला रवींद्र जडेजा व अक्षर पटेल हे अष्टपैलू साथ देतील. युजवेंद्र चहल याची निवड होईल अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, त्याला डावलले गेले.

यानंतर त्याने एक ट्विट केले आहे. त्याने या ट्विटमध्ये काहीही लिहिले नसून, एक ढगाकडून दिसणारा सूर्य व त्यानंतर बाण करत एक उगवलेला सूर्य अशा इमोजी वापरल्या आहेत. याचाच अर्थ उद्या सूर्य नक्कीच उगवेल असा होतो. चहल याला आगामी वनडे विश्वचषकासाठी आपली निवड होईल अशी अद्यापही आशा आहे.

दरम्यान, ही पहिली वेळ नाहीये, जेव्हा चहलला महत्वाच्या स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान मिळाले नाहीये. आयसीसी टी20 विश्वचषक 2021 पासून तो अशा महत्वाच्या स्पर्धांना मुकला आहे. 2022 मध्ये खेळल्या गेलेल्या टी20 विश्वचषकात त्याला संघात स्थान मिळाले होते. मात्र, अंतिम अकरामध्ये चहलला संधी मिळाली नव्हती. चहलने भारतीय संघासाठी टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक 96 तर वनडे क्रिकेटमध्ये 121 विकेट्स घेतल्या आहेत.

(Yuzvendra Chahal Post Cryptic Post After Not Selected For Asia Cup In Team India)

महत्वाच्या बातम्या –
आफ्रिदीचा टी10 मध्ये राडा! वयाच्या 43 व्या वर्षी केल्या 300 च्या स्ट्राईक रेटने धावा
BIG BREAKING! आशिया चषकासाठी टीम इंडियाची घोषणा, प्रमुख फलंदाजांचे संघात पुनरागमन

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---