इंग्लंड विरुद्ध शनिवारी (१४ जुलै) झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाचा ८६ धावांनी पराभव झाला.
मात्र क्रिकेट चाहते हा सामना दोन कारणांसाठी स्मरणात ठेवतील.
पहिले म्हणजे सामन्यात इंग्लंडच्या फलंदाजी वेळी एका तरुणाने आपल्या प्रेयसीला भर मैदानात घातलेली लग्नाची मागणी आणि दुसरे भारताच्या फलंदाजी वेळी भारताचा फिरकीपटू युझवेंद्र चहलने एक अप्रतिम स्ट्रेट ड्राइव्ह मारल्यानंतर ड्रेसिंग रुमकडे बॅट उंचावत केलेले सेलिब्रेशन.
भारतीय डावाच्या ४७ व्या षटकात एमएस धोनी बाद झाल्यानंतर युझवेंद्र चहल फलंदाजीस आला होता.
भारतीय संघ यावेळी ८ बाद २१५ अशा स्थीतीत होता. या परिस्थीत भारतीय संघ हा सामना जिंकणे अशक्य होते.
४८व्या षटकात चहलने इंग्लंडच्या डेव्हीड विलीला एक अप्रतिम स्ट्रेट ड्राइव्ह मारला. त्यानंतर अनपेक्षीतपणे चहलने भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुमकडे बघत सेलिब्रशन केले.
https://twitter.com/VinayTr85616518/status/1018190505895608325
चहलच्या या गमतीशीर कृत्यांने भारतीय संघाच्या खेळाडूंसोबत मैदानावरील अनेकांना हसू अनावर झाले. तसेच चहल सोबत नॉन स्ट्राइकवर असलेला कुलदीप यादवही यानंतर खळखळून हसत होता.
या सामन्यात इंग्लंडने भारतावर ८६ धावांनी विजय मिळवत तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली.
या मालिकेते तिसरा आणि शेवटचा सामना मंगळवारी (१७ जुलै) होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-कसोटीसाठी संघ जाहीर झाला नाही तरीही या कारणामुळे रहाणे- विजयचे स्थान पक्के
-फिफा विश्वचषक २०१८: क्रोएशियाच्या लुका मॉड्रीकला गोल्डन बॉल पुरस्कार