भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहलने ११ जूनला म्हणजेच काल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चार वर्षे पूर्ण केली आहेत. यानिमित्ताने त्याने सोशल मीडियावर एक खास संदेश शेअर केला आहे.
त्याने एक फोटो शेअर करत लिहिले, “खेळाचा आनंद घ्या आणि आपल्या स्वप्नांचा पाठलाग करा. स्वप्ने सत्यात उतरतात. आजच्या दिवशी माझे स्वप्न पूर्ण झाले होते. ११ जून २०१६ रोजी मी भारतासाठी पदार्पण केले.” चहलने झिम्बाब्वेविरुद्धच्या वनडे सामन्यातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती.
चहलने ज्या वनडे सामन्यात पदार्पण केले होते, त्याच सामन्यात करुण नायर व केएल राहुलनेही वनडे पदार्पण केले होते.
Three debutants for 1st #ZIMvIND ODI – @klrahul11 (ODI),@karun126 and @yuzi_chahal #TeamIndia pic.twitter.com/zxj0tal1WB
— BCCI (@BCCI) June 11, 2016
चहलने (Yuzvendra Chahal) आपल्या पहिल्या सामन्यात १० षटक गोलंदाजी केली होती. त्यात त्याने २७ धावा देऊन एक विकेट घेतली होती. त्यानंतर त्याने ५२ वनडे सामने खेळले असून २५.८३ च्या सरासरीने त्याने ९१ विकेट्स घेतल्या आहेत. तर ४२ टी२० सामन्यात २४.३४ च्या सरासरीने ५५ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने आयपीएलमध्ये ८४ सामन्यांत १०० बळी घेतले आहेत. पण तो आतापर्यंत कसोटी सामन्यात पदार्पण करू शकलेला नाही.
While growing up I always wondered about this thought “Enjoy the game and chase your dreams. Dreams do come true”
Can actually say today Dreams do come true.
My dream came true on this day..!! 11th of June 2016 debut for India 🇮🇳 pic.twitter.com/hSlP7yKQ6C— Yuzvendra Chahal (@yuzi_chahal) June 11, 2020
चहल हा भारतीय संघातील प्रत्येकाचा जवळचा मानला जातो. आणि त्याच्या विनोदी शैलीमुळे चाहत्यांनाही तो खूप आवडतो. त्याचा चहल टीव्ही शोही खूप पसंत केला जात आहे. या दिवसात त्याचे टिकटॉक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.