रविवारी (१४ नोव्हेंबर) आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने न्यूझीलंड संघाला पराभूत करत जेतेपद मिळवले. तर विजयाचे प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या भारतीय संघाला उपांत्यफेरीत देखील स्थान मिळवता आले नव्हते. ज्यामुळे भारतीय चाहते भलतेच निराश झाले होते. तसेच या संघाच्या निवडीवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले होते. युझवेंद्र चहल आणि शिखर धवनसारख्या अनुभवी खेळाडूंना या संघात स्थान दिले गेले नव्हते. आता युझवेंद्र चहलने याबाबत आपले मत मांडले आहे.
युझवेंद्र चहल हा भारतीय संघातील सर्वात अनुभवी गोलंदाजांपैकी एक आहे. परंतु आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठीच्या संघात त्याला स्थान देण्यात आले नव्हते. त्यावेळी युझवेंद्र चहलला स्थान देण्यात आले नव्हते. या निर्णयानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. आयपीएल २०२१ स्पर्धेचा पहिला टप्पा भारतात पार पडला होता,या टप्प्यात त्याला चांगली कामगिरी करता आली नव्हती.परंतु यूएईमध्ये झालेल्या आयपीएल २०२१ स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात त्याने अप्रतिम गोलंदाजी केली होती.
आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या संघातून वगळल्यानंतर युझवेंद्र चहल म्हणाला की, “मला ४ वर्ष संघाबाहेर केले गेले नव्हते. मग त्यानंतर मला अचानक मोठ्या स्पर्धेतून बाहेर करण्यात आले. मला खरच खूप वाईट वाटलं होतं. मी दोन ते तीन दिवस खूप निराश होतो. त्यानंतर मला वाटले की, आयपीएल स्पर्धेचा दुसरा टप्पा अगदी जवळ आहे. मी पुन्हा माझ्या प्रशिक्षकांकडे गेलो आणि त्यांच्याशी संवाद साधला.”
तो पुढे म्हणाला की, “कठीण काळात माझी पत्नी आणि माझ्या कुटुंबातील सदस्य मला प्रोत्साहित करत होते. माझे चाहते प्रोत्हाहन देणाऱ्या पोस्ट करून माझा उत्साह वाढवत होते. मी माझ्या ताकदीला आधार देण्याचे ठरवले आणि माझे भ्रम दूर केले. मी जास्त वेळ नाराज राहू शकत नाही. कारण त्यामुळे माझ्या आयपीएल स्पर्धेतील कामगिरीवर परिणाम झाला असता.” त्याने यूएईमध्ये झालेल्या आयपीएल २०२१ स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात ८ सामन्यात १४ गडी बाद केले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
न्यूझीलंडविरुद्ध पाहायला मिळणार रोहितचा ‘हिटमॅन’ अवतार! विराट, गप्टिलला पछाडत करणार भीमपराक्रम