भारतीय संघाने लॉर्ड्सच्या मैदानावर दुसऱ्या कसोटी सामन्यात ऐतिहासिक विजय मिळवला. भारतीय संघाने इंग्लंडला १५१ धावांनी नमवत ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी मिळवली. या दरम्यान भारताच्या विजयात महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेल्या मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांचे पूर्ण क्रिकेट जगतातून कौतुक केले जात आहे.
५ व्या दिवशी भारतीय संघाचा डाव कोलमडला असताना, या दोघांनीही ९ व्या विकेटसाठी ८९ धावांची भागीदारी केली. ज्यामुळे सामन्यात मजबूत स्थितीत असलेल्या इंग्लंड संघाला चांगलीच अडचण निर्माण झाली. त्यानंतर भारतीय संघाने २९८ धावांवर ८ अशी परिस्थिती असताना डाव घोषित केला. ज्यामुळे इंग्लंडला २७२ धावांचे लक्ष्य मिळाले. या नंतर गोलंदाजीत देखील या दोघांनी कमाल करत भारतीय संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली.
याबाबतच भारतीय फिरकीपटू गोलंदाज युजवेंद्र चहलने देखील मजेशीर ट्विट करत, या दोघांचे कौतुक केले. चहल पहिल्या दिवसापासून या सामन्यावर लक्ष ठेवून होता. त्यामुळे शमी-बुमराह यांच्या फलंदाजीचे कौशल्य पाहून चहलने ट्विट करत लिहिले.
“भारताच्या खालच्या फळीतील हे फलंदाज स्विप सुद्धा मारणार, पुल सुद्धा मारणार आणि लेग साईडचा चेंडू ऑफ साईडला सुद्धा मारणार,” असे मजेशीर ट्विट करत चहलने शमी-बुमराह यांचे कौतुक केले.
Yeah indian lower order sweep bhi maarega pull bhi maarega drive bhi maarega leg side ki ball off side bhi maarega 🇮🇳🇮🇳 #IndvsEng @MdShami11 @Jaspritbumrah93 💪👏
— Yuzvendra Chahal (@yuzi_chahal) August 16, 2021
दरम्यान, इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील दुसरा सामना पहिल्या दिवसापासून रंगतदार पद्धतीने चालू होता. दोन्ही संघ एकमेकांवर वरचढ ठरत होते. ज्यामुळे सामन्याचा निर्णय शेवटच्या दिवसापर्यंत गेला. इंग्लंडला शेवटच्या दिवशी ६० षटकात २७२ धावांची गरज होती. तेव्हा भारतीय गोलंदाजांनी उत्कृष्ट गोलंदाजीचे प्रदर्शन करत. यजमान संघाला १२० धावातच गारद केले आणि भारतीय संघाने लॉर्ड्सच्या मैदानात एक ऐतिहासिक विजय मिळवला.
महत्वाच्या बातम्या-
–केएल राहुलवर फेकले शॅम्पेन कॉर्क; जाफरने लॉर्ड्सवरील विजयानंतर करुन दिली सचिनच्या विधानाची आठवण
–मैदानात घुसलेल्या ‘त्या’ प्रेक्षकाला जडेजाने विचारलेला ‘हा’ प्रश्न
–क्या बात!! मोहम्मद शमीचा ९२ मीटर लांब षटकार मारल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर घालतोय धूमाकूळ