भारतीय संघाचा फिरकीपटू युजवेंद्र चहल सोशल मीडियावर त्याच्या वेगवेगळ्या फोटो, व्हिडिओमुळे नेहमीच चर्चेत असतो. सध्या त्याने नवीन हेयर स्टाईल केलेला फोटो पोस्ट केला होता. या फोटोला त्याने चाहत्यांची वाहवा मिळवली होती. तर नुकत्याच पोस्ट केलेल्या त्याच्या फोटोची चर्चा ही झालीच सोबतच त्याला एका खेळाडूने केलेल्या कमेंटची अधिक चर्चा झाली आहे.
चहलने दुधी भोपळा (लौकी) बॅटच्या स्टाईलने पकडला असतानाचा त्याचा फोटो इन्टाग्रामवर पोस्ट केला. हा फोटो पोस्ट करताना त्याने “मी शर्यत लावतो की माझी सेल्फी विथ लौकी स्टेडियमबाहेर प्रसिद्ध आहे, याच्याशी तुम्ही सहमत आहात?,” असे कॅप्शन देत पोस्ट केला आहे.
https://www.instagram.com/p/CeYoaTNvZVw/?utm_source=ig_web_copy_link
चहलची (Yuzvendra Chahal) ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल झाली आहे. त्यातच युवराज सिंगने ही पोस्ट पाहिली असता त्याला कमेंट करण्याचा मोह आवरता आला नाही. त्याने “तुझ्या लौकीचा आकार तुझ्या एवढाच आहे,” अशी कमेंट केली आहे. ही कमेंटही आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
चहलने इंडियन प्रीमियर लीग २०२२च्या हंगामात राजस्थान रॉयल्सकडून खेळताना १७ सामन्यांत सर्वाधिक २७ विकेट्स घेत पर्पल कॅपवर आपला हक्क बजावला. त्याची ही कामगिरी पाहून त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यासाठी भारतीय संघात स्थान मिळाले आहे.
दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतीय दौऱ्यावर आला असून ते पाच सामन्यांची टी२० मालिका खेळणार आहेत. यातील पहिला सामना ९ जूनला दिल्ली येथे खेळला जाणार आहे. यासाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ आधीत दिल्लीत दाखल झाला आहे.
चहलबरोबरच त्याचा जोडीदार कुलदीप यादव यालाही संघात जागा मिळाली आहे, तर दिनेश कार्तिकने २०१९च्या विश्वचषकानंतर संघात पुनरागमन केले आहे.
दक्षिण आफ्रिके विरुद्ध भारतीय संघ-
केएल राहुल (कर्णधार), ऋतूराज गायकवाड, श्रेयस अय्यर, दीपक हुडा, हार्दिक पंड्या, वेंकटेश अय्यर, अक्षर पटेल, इशान किशन, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, युजवेंद्र चहल, कुलदिप यादव, रवि बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंह आणि उमरान मलिक.
महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
युवीला आठव्या वर्षी बोल्ड करणारा मुशीर मुंबईच्या टीममध्ये आलाय
स्टोक्सला वाढदिवशी नशिबाची साथ, क्लीन बोल्ड असूनही पंचांनी दिले जीवदान, नेमकं झालं तरी काय?