काही दिवसांपुर्वी भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहलचा धनश्री वर्मासोबत साखरपुडा झाला आहे. चहलने दोघांचाही फोटो सोशल मिडियावर शेअर करत सर्वांना ही गोड बातमी दिली होती. चहलची होणारी पत्नी धनश्री ही डॉक्टर, डान्स कोरियोग्राफर आणि यूट्यूबर आहे.
नुकताच धनश्रीचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत धनश्री विमानतळावर पीपीई किट घालून कुर्ता पजामा या गाण्यावर नाचताना दिसत आहे. तिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर केला आहे. तिच्या या व्हिडिओला चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात पसंती दर्शवली आहे. Yuzvendra Chahal’s Fiance Dhanashree Verma’s Dance Video Viral On Social Media
धनश्री ही स्वत: डान्स कोरियोग्राफर असल्यामुळे ती खूप चांगली नाचू शकते. आता चहलचे चाहतेही धनश्रीला सोशल मीडियावर फॉलो करत आहेत. धनश्रीने शेअर केलेल्या या व्हिडिओवर स्वत: चहलनेही कमेंट केली आहे. त्याने कमेंटमध्ये दिलचा इमोजी शेअर केला आहे.
https://www.instagram.com/p/CDvhXZulUV5/?utm_source=ig_web_button_share_sheet
आरसीबीने आतापर्यंत एकदाही आयपीएल ट्रॉफी जिंकली नाही. त्यामुळे यावर्षी आरसीबी संघातील सर्व खेळाडू त्यांचे उत्कृष्ट देत आयपीएलच्या विजेतेपदाला गवसणी घालण्याचा प्रयत्न करतील. चहलने आतापर्यंत आयपीएलमध्ये ८४ सामने खेळले आहेत. दरम्यान २३.१८ च्या सरासरीने १०० विकेट्स घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
ऍडम गिलख्रिस्टने अखेर मान्य केलेच, भारताच्या ‘या’ दोघांनी आम्हाला फारच त्रास दिला
वेबसिरीज पाहून कंटाळलात, या चॅनेलवर तुम्ही घेऊ शकता कॅरेबियन प्रीमियर लीगचा आनंद, वेळ आहे..
स्वातंत्र्य दिनी सचिन तेंडुलकर आयडीबीआय फेडरल फ्यूचर फियरलेस मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवणार
ट्रेंडिंग लेख –
२ वेळा विश्वचषकात संधी मिळूनही दुखापतीमुळे खेळू न शकलेली हरहुन्नरी पुणेकर देविका वैद्य
पुण्याच्या अनाथालयातील पोरगी, जीने ४ वेळा ऑस्ट्रेलियाला केले विश्वविजेते
भारताच्या ८८ वर्षांच्या कसोटी क्रिकेट इतिहासात सर्वात यशस्वी ठरलेले ५ कर्णधार