पाकिस्तानचे माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज झहीर अब्बास यांची तब्येत बिघडली असून त्यांना लंडनमधील एका रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी अब्बास यांना कोरोनाची लागण झाली होती, ज्यानंतर त्यांची तब्तेय आणखीनच खालावली आहे. याच कारणास्तन त्यांना उपचारासाठी लंडनमधील एका रुग्णालयात भरती करण्यात आले असल्याचे समजत आहे.
माध्यमांतील वृत्तांनुसार, अब्बास (Zaheer Abbas) जेव्हा लंडनला जाण्यासाठी विमान पकडत होते, तेव्हाच ते कोरोना संक्रमिताच्या (Covid Positive) संपर्कात आले होते. त्यामुळे त्यांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर जेव्हा ते लंडनला पोहोचले, तेव्हा त्यांच्या किडनीमध्ये वेदना जाणवू लागल्या. तसेच त्यांना न्यूमोनियादेखील झाला आहे. त्यामुळे त्यांना त्वरित जवळच्या रुग्णालयात दाखल करावे लागले. ते सध्या आयसीयूमध्ये डायलिसिसवर (Zaheer Abbas In ICU) असून डॉक्टरांनी लोकांना त्यांना भेटण्यासाठी नकार दिला आहे.
यानंतर चाहत्यांपासून मोठमोठे क्रिकेटपटू अब्बास लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत. याचदरम्यान पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू मोहम्मद हाफिज यांनीही अब्बास यांच्या बरे होण्यासाठी प्रार्थना केली आहे. त्यांनी ट्वीट करत लिहिले आहे की, ‘झहीर अब्बासजी यांना लवकरात लवकर बरे होण्यासाठी आणि स्वस्थ आरोग्यासाठी प्रार्थना करतो.’ हाफिजव्यतिरिक्त इतर बऱ्याच क्रिकेटपटूंनी अब्बास यांच्यासाठी प्रार्थना केल्या आहेत.
Wishing speedy recovery & complete health to Zaheer Abbas sb. Get well soon. Aameen 🤲🏼 https://t.co/ld5VH2nj7f
— Mohammad Hafeez (@MHafeez22) June 21, 2022
अशी राहिली झहीर अब्बास यांची कारकिर्द
आशियाई ब्रॅडमन, ७४ वर्षीय अब्बास यांनी १६ वर्षे पाकिस्तान क्रिकेटची सेवा केली होती. १९६९ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध कसोटी क्रिकेटद्वारे त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यांनी कसोटी कारकिर्दीमध्ये ७८ सामने खेळताना ५०६२ धावा केल्या होत्या. यादरम्यान त्यांच्या बॅटमधून १२ शतके आणि २० अर्धशतके निघाली होती. तसेच वनडे क्रिकेटमध्ये ६२ सामने खेळताना ७ शतकांच्या मदतीने २५७२ धावांची कामगिरी त्यांनी केली होती.
प्रथम श्रेणी क्रिकेटमधील कामगिरीने मात्र त्यांनी सर्वांना प्रभावित केले होते. तब्बल ४५९ प्रथम श्रेणी सामने खेळताना त्यांनी ३४८४३ धावा जोडल्या होत्या. यादरम्यान त्यांनी १०८ शतके आणि १५८ अर्धशतके लगावली होती.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
आजच्याच दिवशी ९ वर्षांपुर्वी ‘धोनी आणि कंपनी’ने रचला होता इतिहास, बनला होता एकमेवाद्वितीय कर्णधार
‘१० ओव्हर्स अन् ६ विकेट्स’ क्रिकेटचे नियम बदलले!, वाचा सविस्तर
‘कोहलीचा खराब फॉर्म रवि शास्त्रींमुळेच!’, पाकिस्तानच्या माजी दिग्गजाचा विचित्र दावा