---Advertisement---

हार्दिक पंड्या कधी करणार गोलंदाजी? पाहा झहीर खानने काय सांगितले

---Advertisement---

मुंबई । गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये, 26 वर्षीय हार्दिक पंड्याच्या पाठीवर लंडनमध्ये शस्त्रक्रिया झाली. मार्चमध्ये तो क्रिकेटमध्ये परतला, परंतु इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) पहिल्या दोन सामन्यात तो मुंबई इंडियन्सकडून गोलंदाजी करू शकला नाही.

दरम्यान, मुंबई इंडियन्सचे क्रिकेट संचालक झहीर खान यांनी रविवारी सांगितले की, हार्दिक पंड्या गोलंदाजी करण्यास उत्सुक आहे, परंतु संघ व्यवस्थापनेला त्याच्या शरीराकडेही पाहावे लागेल. हा अष्टपैलू पाठीच्या दुखापतीमुळे बरीच विश्रांती घेतल्यानंतर क्रिकेट खेळत आहे.

जेव्हा झहीरला हार्दिकच्या गोलंदाजीबद्दल विचारले गेले तेव्हा तो म्हणाला की, “आम्ही सर्वजण हार्दिककडून गोलंदाजीची अपेक्षा करत आहोत. तो अशा प्रकारचा खेळाडू आहे जो गोलंदाजी करताना कोणत्याही संघाचे संतुलन बिघडू शकतो आणि या गोष्टी तो समजतो.”

तो पुढे म्हणाला की, “परंतु आम्हाला त्याच्या शरीराचादेखील विचार करावा लागेल. आम्ही त्याबद्दल फिजिओशी सल्लामसलत करीत आहोत. आम्हाला त्याला गोलंदाजी करताना पहायचे आहे, तो गोलंदाजी करण्यासही उत्सुक आहे आणि त्याला खरोखरच गोलंदाजी करायची आहे, आपल्याला प्रतीक्षा करावी लागेल आणि संयम ठेववा लागेल. शेवटी गोलंदाजावर दुखापतींचा मोठ्या प्रमाणात परिणाम होतो.”

हार्दिकने कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध विरुद्ध फलंदाजी करताना दोन सामन्यात 18 आणि 14 धावा केल्या. “तो फलंदाज म्हणून तो संघाचा भाग असेल आणि पूर्ण तंदुरुस्तीसह आपले योगदान देत आहे. याचा आम्हाला आनंद आहे.  हे चांगले आहे आणि आशा आहे की आपण लवकरच त्याला गोलंदाजी करताना पहाल,” असेही झहीर खानने सांगितले.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---