पुणे । विराट कोहलीने काल गौरव कपूरच्या ब्रेकफास्ट विथ चॅम्पिअन्स या कार्यक्रमात अनेक गोष्टी सांगितल्या. अगदी दिल्लीमधील एक मस्ती करणारा मुलगा ते भारतीय संघाचा कर्णधार या प्रवासातील अनेक गोष्टींना त्याने यात उजाळा दिला.
या कार्यक्रमात गौरव कपूरच्या एका प्रश्नाला उत्तर देताना विराट म्हणतो, ” मी माझे प्रेमप्रकरण पहिल्यांदा झहीर खान (झॅक) ला सांगितले. मी पहिल्यांदा याबद्दल त्याच्याशीच बोललो. तेव्हा झॅक म्हणाला, जे काही तुला करायचं आहे ते लपवू नकोस. त्यामुळे तुझ्यावरच जास्त ताण येईल. तू प्रेमात आहेस. काही चूक करत नाहीस. “
“मी झहीरला हे सांगितले आणि तो यासाठी योग्य व्यक्ती होता असे मला आता वाटते. काहीही समस्या असेल तर झॅक बरोबर बोललं पाहिजे. मी आजही काही असं असेक तर त्याला फोन करतो. झॅक इज द बेस्ट. ” असेही विराट पुढे म्हणाला.
Link: https://t.co/kTcqKsxnr7
— Gaurav Kapur (@gauravkapur) November 3, 2017
याबरोबर विराटने आपल्या कारकिर्दीत गेल्या चार वर्षात घडलेल्या अनेक गोष्टींचे श्रेय अनुष्का शर्माला दिले आहे.