पाकिस्तान क्रिकेट बोर्ड म्हणजेच पीसीबीमध्ये अलिकडच्या काळात अनेक बदल झाले. पीसीबीच्या नवीन अध्यक्षांच्या रूपात मागच्या काही दिवसांपासून त्यांचे माजी चेअरमन जका अशरफ यांचे नाव चर्चेत होते. पण आता पीसीबीने त्यांच्या नावावर अध्यक्षपदाची मोहर लावल्याचे दिसते. क्रिकेट पाकिस्तानच्या सूत्रांकडून असे समजले आहे की, पीसीबीने जका अशरफ यांना नवीन अध्यक्षांच्या रुपात नियुक्त केले आहे.
माध्यमांतील वृत्तांनुसार जका अशरफ (Zaka Ashraf) गुरुवारी (6 जुलै) लाहोरमध्ये पीसीबी (PCB) अध्यक्षाच्या रुपात आपली पहिली बैठक घेणार आहेत. पाकिस्तान क्रिकेट संघ आणि बोर्डाशी संबंधित काही महत्वाच्या मुद्यांवर या बैठकीत चर्चा होणार असल्याचे सांगितले जात आहे. माहितीनुसार जका अशरफ पुढचे चार महिने पीसीबी अध्यक्षाच्या रुपात कारभार पाहणार आहेत. 10 सदस्यांच्या बीसीसी व्यवस्थानप समितीचे ते नेतृत्व करतील.
Zaka Ashraf assumes charge as Chair of PCB Management Committee pic.twitter.com/G0dvwMmfG2
— Pakistan Cricket (@TheRealPCB) July 6, 2023
Mr Zaka Ashraf chaired the first meeting of the PCB Management Committee at the National Cricket Academy. pic.twitter.com/i3CKatJCLK
— Pakistan Cricket (@TheRealPCB) July 6, 2023
क्रिकेट पाकिस्तानकडून मिळालेल्या माहितीनुसार पीपल्स पार्टीचे समर्थन प्राप्त असलेल्या जका अशरफला पीसीबीशी संबंधित प्रधानमंत्री शहबाज शरीफ यांची परवानगी घ्यावी लागणार आहे. दरम्यान, शहबाज शरीफ (Shehbaz Sharif) पीसीबीचे संरक्षक म्हणून जबाबदारी पार पाडणार आहेत. पीसीबी व्यवस्थापन समितीच्या 10 सदस्यांचा विचार केला, तर यात कलिम उल्लाह खान, अशफाक अख्तर, मुसादिक इस्लाम, अजमत परवेज, जहीर अब्बास, खुर्रम सुमरो, ख्वाजा नदीम, मुस्तफा रामदे आणि जुल्फिकार मलिक यांचा समावेश आहे. (Zaka Ashraf assumes charge as Chair of PCB Management Committee)
महत्वाच्या बातम्या –
ASHES 2023 । तिसऱ्या कसोटीत इंग्लंडचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय, ऑस्ट्रेलियन संघात तीन मोठे बदल
वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी नाही मिळाली संधी! केकेआरच्या स्टार फलंदाज नाराज