पुणे। महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस असोसिएशन (एमएसएलटीए) च्या वतीने व महाराष्ट्र सरकारच्या सहकार्याने आयोजित आयोजित तिसऱ्या टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेत दुहेरीच्या उपांत्य फेरीच्या लढतीत झेकियाच्या जिरी वेस्लीने लिथुआनियाच्या रिकार्डस बेरँकीस याचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.
म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत उपांत्य फेरीच्या लढतीत 3 तास 3 मिनिट चाललेल्या सामन्यात 26 वर्षीय जागतिक क्रमांक 107 असलेल्या झेकियाच्या जिरी वेस्ली याने लिथुआनियाच्या 29 वर्षीय जागतिक क्रमांक 73 असलेल्या दुस-या मानांकीत रिकार्डस बेरँकीस याचा 6-7(8), 7-6(3), 7-6(7) असा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली.
अतितटीचा संघर्षपुर्ण झालेला सामना तीन सेटचा झाला तिनही सेट बाराव्या गेमपर्यंत 6-6 अशा बरोबरीत राहील्याने टायब्रेक झाले. दोन्ही खेळाडूंनी सुरूवातीपासुनच सामन्यावर आपली पकड घट्ट ठेवली. दोन्ही खेळाडूंनी प्रत्येक गेममध्ये आपली सर्व्हिस राखली. पहिला सेट बेरँकीसने 6-7(8) असा जिंकत सामन्यात आघाडी घेतली.
दुसरा सेट टायब्रेकमध्ये जिरी वेस्लीने 7-6(3) असा जिंकून सामन्यात २-२ अशी बरोबरी साधली. तिसरा सेटही बाराव्या गेमअंती 6-6 असा बरोबरीत झाल्याने टायब्रेक झाला व तिसरा सेट जिरी वेस्ली याने 7-6(7) असा जिंकून संघर्षपुर्ण लढतीत 6-7(8), 7-6(3), 7-6(7) असा विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल-
एकेरी गट-उपांत्य फेरी।
जिरी वेस्ली (झेकिया) वि.वि रिकार्डस बेरँकीस (लिथुआनिया)(2) 6-7(8), 7-6(3), 7-6(7)