नुकताच टोकियो ऑलिम्पिक २०२० मोठ्या जल्लोषात पार पडली. या स्पर्धेत जगभरातील खेळाडूंनी घवघवीत यश मिळवले. अनेकांना पदक जिंकण्यात यश आले तर,अनेकांचे पदक जिंकण्याचे स्वप्न स्वप्नच राहिले. पदक जिंकल्यानंतर खेळाडूंनी मोठा साजरा केला होता. तसेच पदक जिंकणाऱ्या खेळाडूंचा सन्मान देखील करण्यात आला होता. ही स्पर्धा होऊन अवघे काही दिवसच उलटले आहेत. दरम्यान चीनची जिमनास्ट झू शूयिंग ने मोठा खुलासा केला आहे.
झू शूयिंगने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवले होते. तिने पदकाच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित केले आहे. तिने दावा केला आहे की,सुवर्ण पदकाचा थर उतरू लागला आहे. ज्याची माहिती तिने सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिली आहे. झूने तीन फोटो शेअर केले आहेत.
ज्यावर तिने कॅप्शन म्हणून लिहिले की,”मी आधीच स्पष्ट करते की, माझा कुठलाही चुकीचा उद्देश्य नाहीये. मी पाहीले की, माझ्या पदकावर छोटा डाग होता. जेव्हा मी ते बोटाने काढायचा प्रयत्न केला, तेव्हा माझ्या निदर्शनात आले की, काहीच बदल झालेला नाहीये, उलट तो डाग आणखी वाढला आहे.” झूच्या या पोस्टवर अनेक युजर्स आपल्या प्रतिक्रीया देत आहेत.(Zhu shuying claims her gold medal is chipping)
या प्रकरणावर ऑलिम्पिक समितीने ही स्पष्टीकरण दिले आहे. त्यांचे असे म्हणणे आहे की, जो थर उतरतोय तो थर सोन्याचा नसून, पदकावर स्क्रॅच येऊ नये म्हणून चडवला गेला होता. त्यामुळे पदकाच्या गुणवत्तेवर कुठलाही फरक पडणार नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
परदेशात कधी येणार हिटमॅनचे शतक? रोहितने नको असलेल्या यादीत गाठले चौथे स्थान
‘प्रत्येक वेळी आक्रमकतेचे प्रदर्शन करणे गरजेचे नाही’, गावसकरांचा विराटला अप्रत्यक्ष टोला
संधी मिळत नसल्याने अश्विनने सुरू केली डाव्या हाताने फलंदाजी, ट्विटर पोस्ट करताना लिहिले…