भारतीय क्रिकेटमधील क्रिकेटपटूंना इतर देशातील खेळण्यासाठी निवृत्त झाल्यानंतरच परवानगी दिली जाते. त्यामुळे भारतातील काही वरिष्ठ खेळाडू एक-दोन वर्ष आधीच निवृत्ती घेत अशा प्रकारे खेळण्याला प्राधान्य देत आहेत. तसेच काही युवा खेळाडूंनी इतर देशात स्थायिक होत या लीगमध्ये भाग घेतलाय. आता झिम्बाब्वे येथे सुरू होत असलेल्या झिम आफ्रो टी10 लीगमध्ये आता भारताचे सहा माजी क्रिकेटपटू खेळताना दिसतील.
मागील पाच वर्षांपासून अबुधाबी येथे अबुधाबी टी10 लीग ही स्पर्धा खेळली जाते. अत्यंत लोकप्रिय असलेल्या या स्पर्धेचा आता नवा हंगाम झिम्बाब्वे येथे खेळण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला होता. याबाबतची घोषणा काही दिवसांपूर्वी झाली होती. त्यानंतर आता यास स्पर्धेसाठी संघांची घोषणा झाली आहे. या स्पर्धेत एकूण 5 संघ सहभागी होतील.
इंग्लंडचा विश्वविजेता कर्णधार ओएन मॉर्गन हा हरारे हरिकेन्स संघाचे नेतृत्व करेल. या संघात भारताचे इरफान पठाण, रॉबीन उथप्पा व श्रीसंत खेळाडू दिसतील. जोहान्सबर्ग बफेलो संघात भारताचा माजी क्रिकेटपटू युसुफ पठाण दिसून येईल. तर, केपटाऊन सॅम्प आर्मी या संघात माजी अष्टपैलू स्टुअर्ट बिन्नी व माजी यष्टीरक्षक पार्थिव पटेल खेळताना दिसणार आहे. याव्यतिरिक्त या स्पर्धेत बुलावायो ब्रेव्हज व डर्बन कलंदर्स हे संघदेखील खेळताना दिसतील. या स्पर्धेला 20 जुलैपासून सुरुवात होईल.
मागील अनेक वर्षांपासून झिम्बाब्वे क्रिकेट हे अत्यंत कठीण परिस्थितीतून जात होते. मात्र मागील काही स्पर्धांमध्ये झिम्बाब्वे संघाची कामगिरी सातत्यपूर्ण होताना दिसते. त्यामुळे झिम्बाब्वे क्रिकेट आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी या स्पर्धेचा फायदा होईल असे आयोजकांकडून सांगितले गेले आहे.
(ZIM Afro T10 League 6 Former Indian Cricketers Selected Pathan Brothers Uthappa There)
महत्वाच्या बातम्या –
नेदरलँड्सच्या विश्वचषक 2023 साठी आशा कामय! विक्रमजीत सिंगच्या शतकामुळे ओमान 74 धावांनी पराभूत
‘हा’ दिग्गज बनणार भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक! बांगलादेश दौऱ्याआधी स्वीकारणार जबाबदारी