भारतीय वरिष्ठ पुरुष संघ सध्या झिम्बाब्वेच्या दौऱ्यावर आहे. यामध्ये तीन सामन्यांची टी 20 मालिका खेळली जाणार आहे. ही मालिका भारत जिंकेल, अशी अपेक्षा आहे. या विजयामध्ये अभिषेक शर्मा चांगली कामगिरी करेल. यादरम्यान मात्र त्याने पाकिस्तानी खेळाडूचा विक्रम मोडू नये, असे भारतीय चाहत्यांना नक्कीच वाटत असेल. कोणता हा विक्रम आहे आणि तो अभिषेकने का मोडू नये, हे जाणून घेऊ.
हा विक्रम एका कॅलेंडर वर्षांत टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होण्याचा आहे. यामुळे अभिषेक झिम्बाब्वे दौऱ्यात एकदा जरी शून्यावर बाद झाला तर तो पाकिस्तानी खेळाडूचा विक्रम मोडेल, जो धक्कादायक असेल. यावर्षी अभिषेक आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय मिळून टी 20 क्रिकेटमध्ये तब्बल नऊ वेळा शून्यावर बाद झाला आहे.
एका कॅलेंडर वर्षांत टी 20 सामन्यांमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होण्याचा विक्रम अभिषेक शर्मा, पाकिस्तानचा शादाब खान आणि अफगाणिस्तानचा रशीद खान यांच्या नावावर संयुक्तपणे आहे. यावर्षी अभिषेक नऊ वेळा शून्यावर बाद झाला आहे, तर शादाबने 2024 मध्ये हा विक्रम केला आहे.
रशीद 2019 मध्ये एका कॅलेंडर वर्षांत टी 20 सामन्यांमध्ये नऊ वेळा शून्यावर बाद झाला आहे. यावरून झिम्बाब्वे दौऱ्यात अभिषेक एका सामन्यात जर शून्यावर बाद झाला तर तो शादाब आणि रशीदला मागे टाकत एकटाच पहिल्या स्थानावर येईल. हा विक्रम काही चांगली बाब नाही आणि त्याला टाळणेच योग्य आहे.
झिम्बाब्वेमध्ये टीम इंडियाची चांगली सुरूवात करण्याचा प्रयत्न
आयर्लंड आणि इंग्लंड जे झाले ते विसरून भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱ्यात चांगली सुरूवात करण्याच्या प्रयत्नात असेल. त्यासाठी अभिषेकला संघाला चांगली सुरूवात करून देण्याची जबाबदारी आहे. त्याने मागील अनेक सामन्यांमध्ये असे केले आहे. त्यामुळे या दौऱ्यातील तिन्ही सामन्यात एकदाही त्याने शून्यावर बाद न होणे आणि उत्तम सुरूवात करून देणे, असे चाहत्यांची इच्छा नक्कीच असणार.
या मालिकेतील पहिला सामना आज (23 जुलै) हरारे येथे खेळला जाणार आहे.
झिम्बाब्वेविरुद्ध अभिषेकची कामगिरी
अभिषेकने झिम्बाब्वेविरुद्ध आतापर्यंत 6 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने एक शतक, एक अर्धशतक केले असून एकदा तो शून्यावर बाद झाला आहे. तसेच तो झिम्बाब्वेविरुद्ध भारताकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने 179 धावा केल्या आहेत. (ZIM vs IND Abhishek Sharma nine ducks in t20I in 2026 joint most in single calender year)





