झिम्बाब्वे आणि आयर्लंड यांच्यात सध्या तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळली जात आहे. मालिकेतील पहिला सामना गुरुवारी (7 डिसेंबर) झिम्बाब्वेने 1 विकेट राखून जिंकला. सिकंदर रझा या विजयात महत्वपूर्ण योगदान देऊ शकला. पण या सामन्यात रझाने आयर्लंडच्या खेळाडूंसोबत राडा घातला होता. आयसीसीने याच कारणास्तव झिम्बाब्वेच्या कर्णधारावर मोठी कारवाई केली आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळ म्हणजेच आयसीसीच्या आचार संहितेचे सिकंदर रझा () याने उल्लंघन केले, असे सांगितले जात आहे. झिम्बाब्वेच्या डावातील 14व्या षटकात सिकंदर रझाकडून ही चूक झाली. या षटकात सर्वात आधी रझा आणि जोशुआ लिटिल यांच्यात शाब्दिक वाद सुरू झाला. त्यानंतर कुर्टिस कॅम्फर या वादात सामील झाला. पण रझा झिम्बाब्वेच्या कर्णधारावर देखील भडकला. रागाच्या भरात रझाने कुर्टिस कॅम्फरवर बॅट देखील उचलली. या वर्तनासाठी त्याला आयसीसीकडून दोन डिमेरिट पॉइंट्स दिले गेले. मागच्या 24 महिन्यांमध्ये त्याला एकूण 4 डिमेरिट पॉइंट्स मिळाल्यामुळे पुढच्या दोन सामन्यांसाठी झिम्बाब्वेचा कर्णधार संघातून बाहेर सलणार आहे. तसेच पहिल्या टी-20 सामन्यासाठी त्याला मिळणाऱ्या सामना शुल्कापैकी 50 टक्के रक्कम आयसीसीकडून कापली जाईल.
दुसरीकडे सिकंदर रझासोबत वाद घालणाऱ्या जोश लिटिल आणि कर्टिस कॅम्फर यांच्यावर देखील आयसीसीने कारवाई केली आहे. या दोघांना प्रत्येकी एक-एक डिमेरिस पॉइंट्स मिळाले आहेत. तसेच सामना शुल्काच्या प्रत्येकी 15-15 टक्के रक्कम कापले गेले. दरम्यान, उभय संघांतील पहिला सामना झिम्बाब्वेने जिंकल्यानंतर शनिवारी (9 डिसेंबर) मालिकेतील दुसरा सामना हरारेमध्ये आयोजित केला गेला. पहिल्या सामन्यातील विजयानंतर झिम्बाब्वे 1-0 अशा आगाडीवर आहे. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना रविवारी (10 डिसेंबर) हरारेमध्येच खेळला जाणार आहे. (Zimbabwe captain Sikandar Raza charged by ICC after receiving four demerit points in 24 months)
महत्वाच्या बातम्या –
कोण आहे ‘ही’ सलामी फलंदाज? WPL लिलावात केले 10 लाखांचे 1.30 कोटी
WPL 2024: लिलावातील अशा 5 खेळाडू, ज्यांना मिळाली 1 कोटीपेक्षा जास्त रक्कम; भारताच्या 2 रणरागिणींचाही समावेश