पूर्वीपेक्षा सध्याच्या क्रिकेट प्रकारात खूप बदल झालेले दिसून येते. पूर्वी फलंदाज केवळ फलंदाजी करायचा तर, गोलंदाज गोलंदाजीत लक्ष द्यायचा. मात्र, क्रिकेटच्या बदलत्या स्वरूपानुसार खेळाडूंनी देखील त्यांच्यात बदल घडवून आणले. सध्याचे खेळाडू कोणत्याही परिस्थितीत आपल्या संघासाठी चांगले खेळण्याच्या प्रयत्नात असतो. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रात आपल्या संघाला योगदान देण्याच्या प्रयत्नात असतो. त्यामुळेच आजकाल आपणाला शेवटच्या फळीतील फलंदाज देखील उत्कृष्ट खेळी करताना दिसून येतो.
याचीच प्रचिती इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील झालेल्या दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये दिसून आली. ज्यामध्ये पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाच्या शेवटच्या फळीतील फलंदाजांनी ३ विकेटसाठी संघात ७३ धावा जोडल्या होत्या. तर दुसऱ्या कसोटी सामन्यात शमी-बुमराह यांच्या जोडीने ९ व्या विकेटसाठी ८९ धावांची भागीदारी केली. ज्यामुळे भारतीय संघ मजबूत स्थितीत आला. भारताने हा सामना १५१ धावांनी जिंकला.
तसेच काहीसे पुन्हा शुक्रवारी (२० ऑगस्ट) झिंबाब्वे आणि नामिबिया यांच्यात सुरू असलेल्या एमर्जिंग प्लेयर मालिकेत (संघातील युवा आणि कमी अनुभव असलेले खेळाडू) घडले. दोन्ही संघातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये झिम्बाब्वेने ५० षटकांतमध्ये ३०४ धावा केल्या. झिम्बाब्वे संघ सुरुवातीपासून मजबूत स्थितीत होता.
मात्र, ४० व्या षटकात ८ व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या कार्ल मुंबाने धडाकेबाज फलंदाजी करत केवळ ३३ चेंडू मध्ये २४२ च्या स्ट्राईक रेटने ८० धावा केल्या. ज्यामध्ये ९ षटकार आणि ३ चौकारांचा समावेश होता. ज्यामुळे झिम्बाब्वेचा संघ ३०० चा टप्पा पार करण्यात यशस्वी राहिला. मुंबाने झिम्बाब्वेच्या वरिष्ठ संघाकडून खेळताना १२ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहे. ज्यामध्ये त्याने १२ विकेट घेतल्या आहेत आणि ८३ धावा देखील केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
–काय सांगताय! अवघ्या १४ वर्षाच्या पोरानं ९८ चौकारांसह ठोकल्या होत्या तब्बल ५५६ धावा
–ऑफ टू दुबई! उर्वरित आयपीएल २०२१ साठी चेन्नई, मुंबई पाठोपाठ दिल्लीचा संघही पोहचला युएईमध्ये, पाहा व्हिडिओ
–युवा ऋतुराज गायकवाड एमएस धोनीकडून घेतोय फलंदाजीचे धडे, व्हिडिओने जिंकली चाहत्यांची मनं