भारताविरुद्ध टी20 मालिका सुरू होण्यापूर्वी झिम्बाब्वेचे मुख्य प्रशिक्षक जस्टिन सिमन्स यांनी भारतीय संघाचा कर्णधार शुबमन गिल याचं तोंडभरून कौतुक केलं. हा 24 वर्षीय खेळाडू ‘विलक्षण क्रिकेटपटू’ असल्याचं ते म्हणाले.
शुबमन गिलनं टी20 क्रिकेटमध्ये भारतासाठी 14 सामन्यांमध्ये 335 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 147.58 एवढा राहिला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघानं नुकताच अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये खेळला गेलेला टी20 विश्वचषक 2024 जिंकला. यानंतर लगेचच होत असलेल्या झिम्बाब्वेविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी युवा भारतीय खेळाडूंची टीम पाठवण्यात आली आहे. या युवा संघाचं नेतृत्व शुबमन गिलच्या खांद्यावर आहे.
भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना झिम्बाब्वेचे प्रशिक्षक सॅमन्स म्हणाले, मी गिलला 2021 मध्ये पहिल्यांदा पाहिलं होतं. तो खूप शानदार क्रिकेटपटू आहे. शुबमनला मी पहिल्यांदा पाहिलं त्यावेळी मी दक्षिण आफ्रिकेसोबत होतो. आम्ही भारताविरुद्ध कसोटी मालिका खेळत होतो. माझ्या मते तो डिसेंबर 2021 होता. त्याला तिथे खेळण्याची संधी मिळाली नाही. मात्र तुम्ही त्याची कार्य शैली पाहू शकता. कसोटी मालिकेदरम्यान त्यानं नेटमध्ये ज्या प्रकारे मेहनत घेतली, ती पाहण्यासारखे होती. त्याचे रेकॉर्ड या सगळ्या गोष्टी स्पष्टपणे सांगतात”.
टी20 विश्वचषक जिंकल्यानंतर भारताच्या रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा या तीन दिग्गज खेळाडूंनी निवृत्ती जाहीर केली. यापुढे ते टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळताना दिसणार नाहीत. संघात युवा खेळाडूंना संधी मिळावी यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाकडून रियान पराग, अभिषेक शर्मा आणि ध्रुव जुरेल यांनी पदार्पण केलं. रियान आणि अभिषेकचा हा पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना असून, ध्रुव भारतीय संघाकडून कसोटी खेळलेला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
झिम्बाब्वेविरुद्ध तीन भारतीय खेळाडूंचं पदार्पण, आयपीएल 2024 मध्ये केली होती चमकदार कामगिरी
युवा खेळाडूंसाठी मोठी संधी, झिम्बाब्वे दाैऱ्यात लागू शकते चक्क कर्णधार रोहितच्या जागेवर वर्णी
चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी टीम इंडिया पाकिस्तानला जाणार का? समोर आलं मोठं अपडेट