---Advertisement---

भारताविरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी झिम्बाब्वेचा संघ जाहीर! सॅम करनच्या भावाची निवड, ‘या’ खेळाडूला पहिल्यांदाच मिळाले स्थान

On: बुधवार, जुलै 22, 2026 2:01 PM
---Advertisement---

गुरूवारपासून (23 जुलै) झिम्बाब्वे आणि भारत यांच्यातील तीन सामन्यांच्या टी 20 मालिकेला सुरुवात होत आहे. या मालिकेसाठी भारताने आपला संघ आधीच जाहीर केला असून, बुधवारी (22 जुलै) झिम्बाब्वेने आपला 15 सदस्यीय संघ जाहीर केला.

या मालिकेत झिम्बाब्वे अनुभवी सिकंदर रझाच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. बांगलादेशविरुद्धच्या त्यांच्या शेवटच्या मालिकेतील महत्त्वाच्या बदलांपैकी एक म्हणजे, विकेटकीपर-फलंदाज तफद्झवा त्सिगाला पहिल्यांदाच टी 20 आंतरराष्ट्रीय संघात स्थान मिळाले आहे.

तसेच संघात अद्याप टी 20 आंतरराष्ट्रीय पदार्पण न केलेला वेगवान गोलंदाज न्यूमन न्यामहुरी याची निवड झाली आहे. त्याला बांगलादेशविरुद्धच्या मालिकेतून किरकोळ दुखापतीमुळे बाहेर ठेवले होते.

झिम्बाब्वेने जाहीर केलेल्या संघात ब्रायन बेनेट, रायन बर्ल आणि ब्लेसिंग मुझारबानी यांचा समावेश आहे. रझाप्रमाणेच हे तिन्ही खेळाडूही अनुभवी असल्याने ते भारताविरुद्ध चांगली कामगिरी करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्याचबरोबर अष्टपैलू वेस्ली माधेवेरेही संघात परतला आहे.

झिम्बाब्वेने नुकतेच घरच्या मैदानावर बांगलादेशविरुद्ध एका कसोटी सामन्याबरोबर मर्यादित षटकांच्या मालिका खेळल्या आहेत. यामधील तीन सामन्याची वनडे मालिका 2-1 अशी जिंकली, तर टी 20 मालिका 1-2 अशी गमावली. टी 20 मालिका गमावली असली तरी, त्यांनी बांगलादेशला चांगली टक्कर दिली. या मालिकेला न्यामहुरी मुकला होता. त्याच्याजागी तनाका चिवांगाला संधी दिली होती, ज्याला भारताविरुद्धच्या टी 20 मालिकेसाठीही संघात कायम ठेवले आहे.

टी 20 मालिकेसाठी दोन्ही संघ
झिम्बाब्वे संघ
– सिकंदर रझा (कर्णधार), ब्रायन बेनेट, रायन बर्ल, तनाका चिवांगा, बेन करन, ब्रॅड इव्हान्स, वेस्ली माधेवेरे, तादिवानाशे मारुमनी, वेलिंग्टन मसाकादझा, ब्लेसिंग मुझारबानी, डायन मायर्स, रिचर्ड एनगारावा, न्यूमन न्यामहुरी, मिल्टन शुंबा, तफद्झवा त्सिगा.

भारतीय संघ – श्रेयस अय्यर (कर्णधार), वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा (उपकर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), शिवम दुबे, सूर्यांश शेडगे, रिंकू सिंग, हर्ष दुबे, प्रिन्स यादव, यश ठाकुर, अशोक शर्मा, मयंक यादव, प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर), रवी बिश्नोई.

मालिकेचे वेळापत्रक-
पहिला सामना – 23 जुलै
दुसरा सामना – 25 जुलै
तिसरा सामना – 26 जुलै

हे तिन्ही सामने हरारे स्पोर्ट्स क्लब येथे खेळले जाणार आहेत.(Zimbabwe name squad announcement for India T20Is series, Ben Curran selected)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---