क्रिकेटमध्ये दिग्गज यष्टीरक्षकाचे नाव काढताच सर्वांच्या मुखात भारताचा माजी यष्टीरक्षक एमएस धोनी याचे नाव येते. वक्तशीरपणा, वेग आणि चातुर्याचे मिश्रण असलेला धोनी त्याच्या यष्टीरक्षण शैलीने अगदी विरोधकांच्याही भुवया उंचावत असे. बऱ्याचदा यष्टी न पाहताही त्याने अनेकांच्या बत्त्या गुल केल्याचे आपण पाहिले आहे. अगदी धोनीच्याच शैलीत झिम्बाब्वेच्या एका यष्टीरक्षकाने प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजाला धावबाद केले आहे.
झिम्बाब्वे विरुद्ध बांगलादेश यांच्यात शुक्रवारी (१६ जुलै) हरारे येथे पहिला वनडे सामना झाला. या सामन्यादरम्यान बांगलादेशच्या डावात झिम्बाब्वेचा यष्टीरक्षक रेगीस चाकाब्वा याच्याऐवजी वेलिंग्टन मस्काद्जा यष्टीरक्षकासाठी उतरला होता. त्याने बांगलादेशच्या तस्किन अहमदला अप्रतिम पद्धतीने धावबाद केले होते.
तस्किनने ४९ व्या षटकातील पाचव्या चेंडूवर डिप मिड विकेटकडे जोरदार शॉट मारला आणि तो एक धाव घेण्यासाठी पळाला होता. त्याने यशस्वीरित्या एक धाव पूर्णही केली होती. त्यानंतर झिम्बाब्वेच्या क्षेत्ररक्षकाने आपला चेंडू अजून पकडला नसल्याने पाहून त्याने सहकारी फलंदाजाला दुसरी धाव घेण्यास सांगितले होते. परंतु तोवर क्षेत्ररक्षकाने चेंडू पकडत यष्टीरक्षक मस्काद्जाकडे फेकला.
मस्काद्जानेही मागे पळत जात चेंडू पकडला आणि यष्टीकडे न पाहता पायापासून बरोबर यष्टीवर थ्रो केला. विशेष म्हणजे, तो चेंडू जाऊन बरोबर यष्टीला धडकला आणि तस्किन धावबाद झाला. त्याच्या या नो लूक रन आऊटने सर्वांना माजी यष्टीरक्षक धोनीची आठवण करुन दिली.
https://twitter.com/ItsRoshanRai/status/1415995325999837194?s=20
धोनीनेही ऑक्टोबर २०१६ मध्ये न्यूझीलंडच्या ब्रेंडन ट्रेलरला अशाच पद्धतीने धावबाद केले होते. त्याचा हा नो लूक स्टाईल रन आऊट अजूनही चर्चेत असतो.
तस्किन अहमदव्यतिरिक्त मस्काद्जाने लिटन दास (१०२ धावा) आणि मेहिदी हसन (२६ धावा) यांनाही या सामन्यात बाद केले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
यष्टीरक्षक क्विंटन डी कॉकचा धोनी-संगकाराच्या मांदियाळीत प्रवेश, केली ‘ही’ अद्वितीय कामगिरी
विंडीजचा ‘हा’ सलामीवीर बनला टी२०तील ‘नवा सिक्सर किंग’, फिंच-गेलही त्याच्यापुढे फेल
ENGvPAK: पहिल्या टी२०त इंग्लंडच्या फलंदाजाचे झंझावती शतक, विक्रमांची लावली रांग