रियल माद्रीदचे माजी मॅनेजर झिनादीन झिदान यांनी आता मॅंचेस्टर युनायटेड बरोबर काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. झिदान यांनी रियल सोडल्यावर कोणत्याच क्लबचे मॅनेजरपद घेतले नाही. युनायटेडचे मॅनेजर जोस मौरिन्हो हे आहेत.
झिदान यांनी रियलला सलग तीन युरो चॅम्पियन लीग, २०१७ची ला लीगा आणि दोन क्लब विश्वचषक जिंकून दिले आहे. तर मौरिन्हो यांची २०१७-१८मध्ये निराशा झाली. २०१६मध्ये युनायटेडमध्ये आल्यावर त्यांनी कम्युनिटी शिल्ड आणि युरोपा लीगचे विजेतेपद मिळवून दिले आहे.
५५ वर्षीय मौरिन्हो यांनी जर नकारात्मक विचार सुरू ठेवले तर झिदान हे त्यांची जागा कधीही घेऊ शकतात. अडीच वर्षे रियलचे मॅनेजरपद साभांळताना त्यांनी मे महिन्यात क्लब सोडला.
वेगळे काही करायचे होते म्हणून रियल सोडले असे झिदान यांनी स्पष्टीकरण दिले. जर झिदान हे युनायटेडमध्ये आले तर तो खूप मोठा बदल असेल. मौरिन्हो येण्याआधी ते पहिले युनायटेडचे सल्लागार होते. आठवर्षापूर्वी मौरिन्हो हे इंटर मिलनमधून आले होते.
तसेच एक वर्षानंतर झिदान स्पोर्टींग डायरेक्टर बनले. यावेळी ते कार्लो अॅसेलोट्टी यांच्याखाली काम करत होते. मग २०१४ला ते रियल माद्रीद कॅस्टीलाचे प्रशिक्षक झाले. तर दोन वर्षानंतर ते रियल माद्रिदचे मॅनेजर झाले.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या-
–क्रोएशियाच्या या तिसऱ्या फुटबॉलपटूचा आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला बाय-बाय…
–गॅरेथ बॅलेच्या नाही तर रोनाल्डोच्या बायसिकल कीकला युरोचे नामांकन