नवी दिल्ली। भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीच्या ३९व्या वाढदिवशी काल (७ जुलै) करोडो चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर संघसहकाऱ्यांनीही त्याला शुभेच्छा दिल्या. परंतु या वाढदिवसाला धोनीला एक खास भेट मिळाली आहे. ही खास भेट त्याला त्याची ५ वर्षीय मुलगी झिवाकडून मिळाली आहे.
धोनीला झिवाकडून खास भेट
५ वर्षीय झिवाने (Ziva Dhoni) आपले वडील धोनीच्या वाढदिवसाला एक खास भेट दिली आहे. खरंतर झिवाने आपल्या वडिलांसाठी एक व्हिडिओ तयार केला आहे. या व्हिडिओसोबत तिने धोनीसाठी गाणेही गायले आहे. झिवाचा हा व्हिडिओ धोनीच्या प्रवासाचा आहे. या व्हिडिओत धोनी आणि झिवाचे काही फोटो लावण्यात आले आहेत. झिवाच्या प्रेमळ आवाजातील हा व्हिडिओ जो कोणी पाहील त्याच्या डोळ्यांमध्ये आनंदाचे अश्रू येतील.
झिवावरील धोनीचे प्रेम
धोनी आपली मुलगी झिवावर खूप प्रेम करतो. त्याने अनेक मुलाखतीत सांगितले आहे, की तो आपल्या मुलीवर खूप प्रेम करतो. धोनी झिवाला कधीच एकटे सोडत नाही आणि तो झिवाला नेहमी काही ना काही ऍक्टिव्हिटी करवतो. जेणेकरून तिच्या ज्ञानात भर पडेल. धोनी सोशल मीडियावर सक्रिय न राहता आपल्या मुलीबरोबर वेळ घालवतो. तिच्याबरोबर तो खूप खेळतो. आयपीएल दरम्यानही धोनी आपल्या मुलीबरोबर दिसतो. सामन्यानंतर असो किंवा ड्रेसिंग रूममध्ये धोनी जिथे- जिथे असतो, तिथे- तिथे झिवा आपल्या वडिलांबरोबर असते.
https://www.instagram.com/tv/CCVhMnUnNhD/?utm_source=ig_web_copy_link
झिवाचा जन्म २०१५मध्ये विश्वचषकादरम्यान झाला होता. त्यावेळी धोनी भारतीय संघाबरोबर ऑस्ट्रेलियामध्ये विश्वचषक खेळत होता. धोनीला झिवा जन्मल्याची माहिती सुरेश रैनाने (Suresh Raina) दिली होती. खरंतर धोनी खेळावर लक्ष देण्यासाठी आपल्या जवळ फोन ठेवत नाही. त्यामुळे साक्षी धोनीने (Sakshi Dhoni) रैनाला मेसेज करत याबाबत सांगितले. मुलगी जन्मल्याचे ऐकताच धोनी खूप खुश झाला होता. परंतु देशासाठी तो भारतात परतला नाही. तो म्हणाला होता, “यावेळी मुलीपेक्षाही देश महत्त्वाचा आहे.”
ट्रेंडिंग घडामोडी-
-या ५ कारणांमुळे एमएस धोनी बनला जागतिक क्रिकेटमधील महान खेळाडू
-“येत्या १० वर्षात धोनी होणार सीएसकेचा बॉस”
-इंग्लंड वेस्ट इंडिज कसोटी मालिकेत हे ५ खेळाडू ठरु शकतात हिरो