---Advertisement---

इंडिया विरुद्ध भारत वादावर सेहवागचे मोठे वक्तव्य, नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या

India Team
---Advertisement---

सध्या भारतामध्ये क्रिकेट प्रेमींकडून इंडिया विरुद्ध भारत हा वाद सातत्याने सुरू आहे. सोशल मीडियावर इंडिया विरुद्ध भारत सतत टॉप ट्रेंडिंग आहे. आता भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने इंडिया विरुद्ध भारत वादावर आपले मत व्यक्त केले आहे. वीरेंद्र सेहवागने ट्विट केले आहे.

अनेक नेटकऱ्यांचे मत असे आहे की, इंडिया हे नाव इंग्रजांनी दिले आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या र्सीवर इंडिया नाव काढून भारत असे लिहिले पाहिजे. असे त्यांना वाटते. वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) ने आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, भारतीय संघाच्या जर्सीवर इंडिया नाव काढून भारत असे लिहिले पाहिजे, कारण भारत आमच्या हृदयात आहे. वीरेंद्र सेहवागने या ट्विटमध्ये बीसीसीआय सचिव जय शाह यांना टॅग केले आहे. याशिवाय वीरेंद्र सेहवागने अनेक ट्विट आणि ट्विटला रिप्लाय देऊन इंडिया नाव काढून भारताच्या नावाचे समर्थन केले आहे. मात्र, वीरेंद्र सेहवागचे ट्विट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सोशल मीडिया यूजर्स सतत कमेंट करून आपली प्रतिक्रिया देत आहेत.

यात सेहवागने थेट ट्विटमध्ये बीसीसीआय सचिव जय शाह यांना टॅग केल्यामुळे यावर गोष्टीवर काय निर्णय घेतला जाईल हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. सोशल मीडियावर हा वाद अधिकच चिगळत चालला आहे. दरम्यान भारतीय संघाची एक मोठी बातमी समोर आली आहे.

सोशल मीडियावर वाद चालू असतानाच विश्वचषकासाठी भारतीय संघाकडून विश्वचषकासाठी संघाची घोषणा करण्यात आली. भारतीय संघाने विश्वचषक 2023 साठी संघ जाहीर केला आहे.

विश्वचषकासाठी भारतीय संघातील खेळाडूंची नावे जाहीर करण्यात आली आहेत. या संघाचा कर्णधार रोहित शर्मा असेल, तर अष्टपैलू हार्दिक पांड्याला उपकर्णधारपद देण्यात आले आहे. याशिवाय शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ईशान किशन, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव यांना संघात स्थान मिळाले आहे. ()

महत्वाची बातमी-
हार्दिक पंड्या विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर महत्वाचा, कर्णधार रोहितने संघ घोषित करतानच सांगितले कारण
भारताचे ‘हे’ 6 खेळाडू पहिल्यांदाच खेळणार वनडे वर्ल्डकप, यादीत स्टार क्रिकेटर्सचा समावेश; पाहा यादी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---