पुणे (11 मार्च 2024) – के. एम. पी. युवा कबड्डी सिरीज 2024 च्या ‘अ’ गटातील सामन्याचा आज शेवटचा दिवस होता. मुंबई शहर विरुद्ध रायगड संघातील लढत महत्वपूर्ण होती. तर बाकी सामने औपचारिक होते. ‘अ’ गटातील अहमदनगर, रत्नागिरी, बीड व मुंबई शहर ह्या संघांनी प्रमोशन फेरीत आपला प्रवेश निश्चित केला.
आजच्या पहिल्या सामन्यात अहमदनगर संघाने नांदेड संघाचा 53-16 असा धुव्वा उडवत सहावा विजय मिळवला. अहमदनगर संघाने गटातील 7 पैकी 6 सामने जिंकत तर 1 सामना बरोबरीत ठेवत गुणतालिकेत पहिले स्थान मिळवले. अहमदनगरच्या प्रफुल झवारे ने स्पर्धेत चढाईत 100 गुणांचा पल्ला पार केला. तर आजचा दुसरा सामना जालना विरुद्ध रत्नागिरी रद्द झाला.
आजचा तिसरा महत्वपूर्ण सामना मुंबई शहर विरुद्ध रायगड यांच्यात झाला. मध्यंतरा पर्यत जोरदार खेळ करत मुंबई शहर ने 24-11 अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर रायगडच्या अनुराग सिंग ने उत्कृष्ट खेळ करत मुंबई शहर संघाला चांगला आव्हान दिले. शेवट पर्यत प्रयत्न करून ही त्याला आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात अपयश आले. मुंबई शहर संघाच्या राज आचार्य व जतिन विंदेच्या सुपर टेन खेळीने मुंबई शहर ने 42-38 असा विजय मिळवत प्रमोशन फेरीत प्रवेश निश्चित केला.
आजच्या शेवटच्या सामन्यात बीड जिल्हा ने धुळे जिल्ह्यावर 35-24 असा विजय मिळवत तिसरा स्थान मिळवले.
‘अ’ गटातील प्रमोशन फेरीसाठी पात्र संघ.
1. अहमदनगर जिल्हा
2. रत्नागिरी जिल्हा
3. बीड जिल्हा
4. मुंबई शहर
‘अ’ गटातील रेलीगेशन फेरी खेळणारे संघ.
1. रायगड जिल्हा
2. नांदेड जिल्हा
3. धुळे जिल्हा
4. जालना जिल्हा
महत्वाच्या बातम्या –
धोनीसारखं विकेटकीपर बनायचं होतं…विदर्भाच्या ‘या’ गोलंदाजानं रणजी फायनलमध्ये केलं मुंबईच्या फलंदाजांना सळो की पळो!
महत्वपूर्ण लढतीत मुंबई शहरने रायगड संघावर विजय मिळवत प्रमोशन फेरीत प्रवेश