इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सध्या जबदस्त फॉर्ममध्ये असणाऱ्या अश्विनचा पहिल्या दोन सामन्यात समावेश न केल्यामुळे क्रिकेटवर्तुळात मोठी चर्चा होती. आज अश्विनला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात संधी देण्यात आली असली तरी त्याचा समावेश का करण्यात आला नाही याच कारण पुढे आलं आहे.
DNA वृत्तपत्रातील रिपोर्ट्नुसार भारताचा कर्णधार विराट कोहली अश्विनला चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी स्कॉडमध्ये घेण्यात विशेष इच्छूक नव्हता. त्याऐवजी त्याला संघात युजवेंद्र चहल किंवा शहाबाद नदीम यापैकी एकाला संघात घेण्यात इच्छुक होता.
वृत्तानुसार नदीमच्या नावावर जरी निवड समितीमध्ये चर्चा झाली नसली नसली तरी चहलला इंग्लडला जाण्याची काही संधी आहे का यावर उहापोह झाला. १०५ एकदिवसीय सामन्यात १४५ बळी घेणाऱ्या अश्विनला निवड समितीने संधी देत इंग्लडला रवाना होणाऱ्या स्कॉडमध्ये त्याचा समावेश केला.
अश्विनचा समावेश न करण्याचं कारण देताना कोहलीने असं म्हटलं , ” अश्विन एक जागतिक दर्जाचा गोलंदाज आहे. तो एक व्यावसायिक खेळाडू आहे. त्याला गेल्या सामन्यात संघ निवड करताना का घेतले नाही हे माहित आहे. त्याने मला याबद्दल पाठिंबाच दिला. हेच माझं आणि त्याच नातं आहे. ”
कोहलीने याबद्दल विस्ताराने बोलताना म्हटले होते की आमच्यात मैदानावरील काही तांत्रिक गोष्टींबद्दल मतभेद आहेत परंतु संघात त्याची निवड होण्याबद्दल ते अजिबात नाहीत.
DNA वृत्तपत्रातीलच एका बातमी नुसार संघातील १० खेळाडू हे कुंबळे प्रशिक्षक नसावा ह्या मताचे होते तर अश्विन एकटा कुंबळे प्रशिक्षक असावा म्हणून त्याच्या बाजूने उभा राहिला.
अश्विनबद्दलच ही चर्चा नसून गोलंदाजीमध्ये अचूकता असणाऱ्या मोहमंद शमीच्या जागी उमेश यादवला संधी दिल्याचीही मोठी चर्चा आहे.