महिला क्रिकेटपटू सिमरन शेख (Simran Shaikh) सध्या चर्चेत आहे. महिला प्रीमियर लीग 2025 (Women Premier League 2025) साठी झालेल्या लिलावात सिमरनला ‘गुजरात जायंट्स’ने (Gujrat Giants) 1.9 कोटी रूपयांना विकत घेतले. आता लिलावात सर्वात महाग ठरलेली खेळाडू सिमरन शेखने सांगितले की, तिचे स्वप्न ‘विराट कोहली’ला (Virat Kohli) भेटण्याचे आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सिमरन शेख (Simran Shaikh) म्हणाली की, इथपर्यंत पोहोचणे तिच्यासाठी सोपे नव्हते. त्यांच्या समाजातील लोकांना अशा गोष्टींसाठी पाठिंबा दिला जात नाही. याशिवाय सिमरनने गुजरात जायंट्सचे (GT) आभार मानले.
सिमरन शेख (Simran Shaikh) म्हणाली, “मी गुजरात जायंट्स कुटुंबाचे आभार मानते. एवढी मोठी रक्कम मिळाल्यानंतर आता त्यांच्यासाठी खेळण्याची जबाबदारी माझी आहे. मी माझ्या पालकांचे आभार मानते कारण माझ्या समाजात अशा गोष्टींना परवानगी नाही. पण त्यांनी मला नेहमीच पाठिंबा दिला, माझे स्वप्न विराट कोहलीला भेटायचे आहे आणि म्हणूनच मी हे सर्व प्रयत्न करत आहे.”
सिमरन शेख 2023 महिला प्रीमियर लीगमध्ये यूपी वॉरियर्सचा (UP Warriorz) भाग होती. तिने यूपीसाठी 9 सामने खेळले, दरम्यान 7 डावात फलंदाजी केली आणि 29 धावा केल्या. 11 ही सर्वोच्च धावसंख्या होती. ती मधल्या फळीतील फलंदाज आहे. सिमरनने तिच्या कारकिर्दीमध्ये आतापर्यंत 80 टी20 सामने खेळले आहेत. त्यामध्ये तिने 34.73च्या सरासरीने 169.78च्या स्ट्राईक रेटने 1,528 धावा केल्या आहेत. दरम्यान तिने 8 अर्धशतके झळकावली आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
सूर्यकांत व्यायाम शाळा, दुर्गामाता स्पोर्टस्, विजय नवनाथ यांची विजयी सलामी
IND vs AUS: गाबा कसोटी दरम्यान संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे हा खेळाडू मालिकेतून बाहेर
IND VS AUS; भारताने फाॅलोऑन टाळला, आकाश-बुमराहची मोलाची भागीदारी, सामना रोमांचक वळणावर






