क्रिकेटटॉप बातम्या

IND vs AUS: गाबा कसोटी दरम्यान संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे हा खेळाडू मालिकेतून बाहेर

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिका आता रंजक वळणावर पोहचली आहे. ज्यातील सध्या तिसरा सामना खेळवला जात आहे. दरम्यान आता मालिका बरोबरीत असून कोणता संघ जिंकेल हे सांगणे कठीण आहे. अश्या परिस्थीतीत मालिकेतील तिसऱ्या सामन्यादरम्यान संघाला मोठा धक्का बसला आहे. संघातील स्टार खेळाडू अचानक बाहेर पडला आहे. तो खेळाडू दुसरा कोणीही नसून  ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेजलवूड आहे. जो पहिला सामना खेळला होता पण दुखापतीमुळे दुसऱ्या सामन्यातून बाहेर पडला होता. पण आत तो तिसऱ्या सामन्यासह मालिकेतून बाहेर पडला आहे. मालिकेत अजून दोन सामने बाकी असून ऑस्ट्रेलियन संघासाठी हा मोठा धक्का असू शकतो.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, जोश हेझलवूडच्या पायच्या (calf) स्नायूच्या बाजूला ताण आला आहे. त्यामुळे तो ब्रिस्बेनमध्ये भारताविरुद्धच्या कसोटी सामन्यात पुढे खेळू शकणार नाही. असे सांगण्यात येत आहे. जोश हेझलवूडला आज म्हणजेच मंगळवारी सकाळी सराव करताना दुखापत झाली आणि एक षटक टाकल्यानंतर तो पुढे खेळू शकला नाही. दरम्यान कसोटी मालिकेतील उर्वरित सामन्यांमधून तो बाहेर राहण्याची शक्यता असल्याचीही माहिती मिळाली आहे. वेळ आल्यावर त्याच्या जागी दुसऱ्या कोणाचा तरी संघात समावेश केला जाईल. क्रिकेट ऑस्ट्रेलियानेही याला दुजोरा दिला आहे. मात्र, पुढील कसोटीत स्कॉट बोलंड पुन्हा खेळायला येण्याची शक्यता आहे. ज्याने भारताविरुद्ध दुसरी कसोटी खेळली आणि चांगली गोलंदाजीही केली.

भारताविरुद्धच्या या मालिकेतील पहिल्या सामन्यात जोश हेझलवूडने पाच विकेट्स घेतल्या होत्या. पहिल्या डावात 29 धावांत चार बळी घेतले आणि त्यानंतर दुसऱ्या डावात 28 धावा देत एक यश संपादन केले. यानंतर दुखापतीमुळे तो दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडला. त्याच्या जागी स्कॉट बोलँड संघात प्रवेश करतो. दुसऱ्या सामन्यात त्याने संघासाठी 5 बळी घेतले. मात्र जोश हेझलवूडच्या पुनरागमनामुळे त्याला गाबा कसोटीतून बाहेर जावे लागले.

हेही वाचा-

IND VS AUS; भारताने फाॅलोऑन टाळला, आकाश-बुमराहची मोलाची भागीदारी, सामना रोमांचक वळणावर
IND vs AUS: रवींद्र जडेजाची ऐतिहासिक खेळी, अशी कामगिरी करणारा एकमेव भारतीय
IND VS AUS; रोहित शर्माची सरासरी SENA देशांमध्ये भुवनेश्वर कुमारपेक्षा कमी

Related Articles