---Advertisement---

‘चहलची खराब कामगिरी भारताच्या पराभवाचे प्रमुख कारण’, भारताचा माजी दिग्गज तापला

On: मंगळवार, जून 14, 2022 4:03 PM
Yuzvendra-Chahal-
---Advertisement---

भारत आणि दक्षिण अफ्रीका यांच्यात सुरू असलेल्या मालिकेतील तिसरा टी२० सामना मंगळवार दिनांक १४ जून रोजी खेळला जाणार आहे. या मालिकेत ५ टी-२० सामने खेळले जाणार आहेत. या मालिकेत खेळलेल्या गेलेल्या दोन्ही सामन्यात भारताला पराभवाचे तोंड पहावे लागले आहे. या पराभवाचे मुख्य कारण म्हणजे भारतीय फिरकीपटूंचे अपयश आहे. असे मतं माजी क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्राने व्यक्त केले आहे. 

भारताचा माजी फलंदाज आकाश चोप्राने आपल्या युट्युब चॅनलवर बोलताना म्हटले की, “भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने भारताला चांगली सुरूवात दिली आहे . मात्र मधल्या षटकांत संघाला नियंत्रित गोलंदाजी करता आलेली नाही. तसेच मधल्या षटकांत गडी बाद करण्यासाठी सुद्धा झगडावे लागत आहे. भारताचे क्षेत्ररक्षणदेखील लाजीरवाणे झाले आहे. पहिल्या सामन्यात श्रेयस अय्यरने सोडलेला झेल भारताला महागात पडला आणि हा सामना गमवावा लागला.”

पुढे बोलताना आकाश चोप्रा म्हणाला की, “चहल हा मागील काही वर्षांपासुन भारतासाठी एक प्रमुख फिरकीपटू राहिला आहे. चहलने मालिकेत आतापर्यंत टाकलेल्या ६.१ षटकांत १०हुन अधिकच्या इकॉनॉमीने ७५ धावा देत निराश केले आहे. त्यात भारतीय फिरकीपटूंवर जोरदार आक्रमण करीत साऊथ अफ्रीकाच्या फलंदाजांनी त्यांच्यावर दडपण आणले आहे. तसेच चहलला आयपीएलच्या शेवटच्या सामन्यातही बळी मिळवण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागली आहे. आणि म्हणुन हा भारतासाठी फार चिंतेचा विषय बनला आहे.”

दरम्यान, भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका या मालिकेतील तिसरा टी२० सामना मंगळवारी विशाखापट्टनम येथील डॉ. वायएस राजशेखर रेड्डी एसीए-व्हीडीसीए मैदानावर खेळला जाणार आहे. या मैदानावरील याआधी झालेल्या सामन्यांचा विचार केल्यास खेळपट्टी गोलंदाजांंसाठी पोषक आहे. शिवाय फिरकी गोलंदाजांना याआधीच्या सामन्यात फायदा झाल्याचे पहायला मिळाले आहे. अशातच आपल्या ताकदवर पुनरागमनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या चहलला तिसऱ्या सामन्यात पुनरागमन करत विशेष कामगिरी करण्याची संधी उपलब्ध आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

टीम इंडियाच्या नावावर असणारे लाजिरवाणे विक्रम; पाहून तुम्हीही म्हणाल, ‘नको रे बाबा!’

तिसऱ्या टी२० सामन्यात कोण ठरणार वरचढ, वाचा काय सांगतोय मैदानाचा इतिहास

तब्बल सात वर्षानंतर टीम इंडियावर येणार ‘ती’ नकोशी वेळ?, दक्षिण आफ्रिका ठरणार का कारण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---