पुणे । पीवायसी हिंदू जिमखाना क्लब आयोजित सातव्या पीवायसी-पुसाळकर सु-रक-क्षा कंपोनंट्स पीवायसी प्रीमियर लीग क्रिकेट 2019 स्पर्धेत एनएच वुल्वस, जॅगवॉर्स, टस्कर्स, लायन्स, बुल्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून विजयी सलामी दिली.
पीवायसी हिंदू जिमखाना क्लबच्या मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत पहिल्या सामन्यात शिरीष साठे(2-3)याने केलेल्या शिस्तबद्ध गोलंदाजीच्या जोरावर एनएच वुल्वस संघाने हॉग्स संघावर 5 गडी राखून विजय मिळवला. हॉग्स संघाला पहिल्यांदा खेळताना 6षटकात 5बाद 47धावा करता आल्या. यात अभिजित तावरेने सर्वाधिक 30 धावा केल्या. एनएच वुल्वसकडून शिरीष साठे(2-3), अभय बागमार (1-8), अन्विर नाना(1-6)यांनी सुरेख गोलंदाजी केली. हे आव्हान अपूर्व जैन नाबाद 20, अनुज लोहाडे 12, प्रसाद जाधव 7 यांनी केलेल्या धावांच्या जोरावर एनएच वुल्वस संघाने 4.2षटकात 3बाद 48धावा करून पूर्ण केले.
दुसऱ्या सामन्यात देवेंद्र चितळे नाबाद 31 धावांच्या जोरावर बुल्स संघाने लायन्स संघाचा 7गडी राखून विजयी सलामी दिली. अन्य लढतीत हर्षा जैन याने केलेल्या 32धावांच्या खेळीच्या जोरावर हॉग्स संघाने कोब्राज संघाचा 25धावांनी पराभव केला. रिषभ गादिया(नाबाद 10 धावा व 3-8) याने केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर जॅगवॉर्स संघाने वूल्वसचा 7 गडी राखून पराभव केला. हर्षल गंद्रेच्या नाबाद 51 धावांच्या जोरावर टस्कर्स संघाने चिताजचा 17धावांनी पराभव करून विजयी सलामी दिली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:
हॉग्स: 6षटकात 5बाद 47धावा(अभिजित तावरे 30(17), सिद्धार्थ बदामीकर 6, प्रशांत वैद्य 4, शिरीष साठे 2-3, अभय बागमार 1-8, अन्विर नाना 1-6)पराभूत वि.एनएच वुल्वस: 4.2षटकात 3बाद 48धावा(अपूर्व जैन नाबाद 20(11), अनुज लोहाडे 12, प्रसाद जाधव 7, शिरीष आपटे 2-9, हर्षा जैन 1-5);सामनावीर-शिरीष साठे;
लायन्स: 6षटकात 5बाद 60धावा(विमल हंसराज 21(12), गौरव कासट 12, ओजस साबडे नाबाद 16, देवेंद्र चितळे 1-12, सुमेध गांगल 1-6, उदय जाधव 1-9)पराभूत वि.बुल्स:5.2षटकात 1बाद 63धावा(देवेंद्र चितळे नाबाद 31(12,3×4,2×6), पराग चोपडा 17(16), योगेश भोंगळे नाबाद 9, रोहन जमेनिस 1-11);सामनावीर-देवेंद्र चितळे;
वूल्वस: 6षटकात 5बाद 71धावा(अन्विर नाना 32(16, 3×4,2×6), अनुज लोहाडे 24(11,2×4,2×6), रिषभ गादिया 3-8)पराभूत वि.जॅगवॉर्स: 5.3षटकात 1बाद 72धावा(रवींद्र कासट 31(16,3×4, 2×6), अक्षय ओकी नाबाद 19(13), रिषभ गादिया नाबाद 10, अनुज लोहाडे 1-17);सामनावीर-रिषभ गादिया;
टस्कर्स: 6षटकात 2बाद 83धावा(हर्षल गंद्रे नाबाद 51(17,5×4,4×6), श्रीनिवास चाफळकर 21(11), विक्रांत पाटील 1-12)वि.वि.चिताज: 6षटकात 4बाद 66धावा(आत्मन बागमार 17(13), चारुदत्त दातार 18(12), हर्षल गंद्रे 2-6, अंजनेया साठे 1-10);सामनावीर-हर्षल गंद्रे;
लायन्स: 6षटकात 5बाद 42धावा(महेंद्र गोखले 14(14), कृष्णा मेहता 1-4, राहुल कुंकुलोल 1-6, अभिजित भाटे 1-5, राहुल गांगल 1-10)वि.वि.विअरवूल्वस: 6षटकात 3बाद 39धावा(अभिजित गानू 12(12), कृष्णा मेहता 10, गौरव कासट 1-1, महेंद्र गोखले 1-3, मकरंद चितळे 1-8);सामनावीर-गौरव कासट
हॉग्स: 6षटकात 3बाद 71धावा(हर्षा जैन 32(14), सिद्धार्थ बदामीकर 19(11), अभिजित तावरे 13, असिम देवगावकर 1-10, हेमंत पिंपळे 1-21)वि.वि.कोब्राज: 6षटकात 4बाद 46धावा(विशाल गोखले 15, प्रतीक वांगीकर 10, आदित्य गांधी 1-6, यश परांजपे 1-5, शिरीष आपटे 1-15);सामनावीर-हर्षा जैन.