---Advertisement---

रिंकू सिंगची कर्णधारपदी नियुक्ती, या प्रमुख स्पर्धेमध्ये संघाचे नेतृत्व करणार

---Advertisement---

या महत्त्वाच्या स्पर्धेसाठी भारतीय फलंदाज रिंकू सिंगकडे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. 21 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत रिंकू उत्तर प्रदेश संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. या स्पर्धेसाठी उत्तर प्रदेशने 19 खेळाडूंचा संघ जाहीर केला असून त्याची कमान मधल्या फळीतील फलंदाज रिंकूकडे सोपवण्यात आली आहे.

उत्तर प्रदेश क्रिकेटमध्ये प्रत्येक स्पर्धेपूर्वी काही ना काही बदल नक्कीच पाहायला मिळतो आणि यावेळीही तेच घडले. रणजी ट्रॉफीमध्ये युवा आर्यन जुयालकडे संघाचे कर्णधारपद देण्यात आले होते. तर सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये अनुभवी भुवनेश्वर कुमारला संघाचे कर्णधारपद देण्यात आले होते. भुवनेश्वरच्या नेतृत्वाखाली संघ उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला होता. आता पुन्हा एकदा स्पर्धेच्या वनडे फॉरमॅटमध्ये बदल करण्यात आला आणि रिंकू सिंगला कर्णधार बनवण्यात आले.

या स्पर्धेत यूपीला आपले सर्व साखळी सामने आंध्र प्रदेशात खेळायचे आहेत. संघाला पहिल्याच दिवशी जम्मू-काश्मीरच्या संघाला सामोरे जावे लागणार आहे. यानंतर 23 डिसेंबरला त्यांचा सामना मिझोरामशी होईल आणि त्यानंतर 26 डिसेंबरला त्यांचा सामना तमिळनाडूशी होईल. तर त्यानंतर सामना 28 तारखेला छत्तीसगड, 31 तारखेला चंदीगड आणि 3 जानेवारीला विदर्भाशी होणार आहे.

विजय हजारे ट्रॉफीसाठी यूपी संघ: रिंकू सिंग (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, माधव कौशिक, करण शर्मा, प्रियम गर्ग, नितीश राणा, अभिषेक गोस्वामी, अक्षदीप नाथ, आर्यन जुयाल, आराध्या यादव, सौरभ कुमार, कृतज्ञ कुमार सिंग, विमगा , मोहसीन खान, शिवम मावी, आकिब खान, अटल बिहारी राय, कार्तिक्य जयस्वाल, विनीत पनवार

हेही वाचा-

3 कारणे ज्यामुळे रोहित शर्मा आणि विराट कोहलीचा हा शेवटचा ऑस्ट्रेलिया दौरा ठरणार
IND vs AUS: हा फलंदाज आशियाबाहेर सतत अपयशी, ऑस्ट्रेलियातही फ्लाॅप कामगिरी
गाबा कसोटीच्या चौथ्या दिवशी संघाला मोठा धक्का, स्टार गोलंदाज रुग्णालयात दाखल

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---