मॉस्को। 21व्या फिफा विश्वचषकात आज माजी विजेता जर्मनी मेक्सिकोला भिडणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री 8.30ला या सामन्याला सुरूवात होणार आहे.
हे दोन संघ 11वेळा आमने-सामने आले आहेत. त्यातील जर्मनीने 5 सामने आणि मेक्सिकोने एक सामना जिंकला असून 5 सामने अनिर्णित राहिले आहेत.
यामध्ये जर्मनीने 24 गोल आणि मेक्सिकोने 10 गोल केले आहेत.
फिफा क्रमवारीत जर्मनी अव्वल स्थानावर तर मेक्सिको 15व्या स्थानावर आहे. जर्मनीने 18 वेळा तर 15 वेळा मेक्सिकोने विश्वचषकात सहभाग घेतला आहे.
जर्मनीने विश्वचषक पात्रता फेरीतील सर्वच्या सर्व 10 सामने जिंकले आहेत. तसेच मागच्या विश्वचषकातील काही खेळाडूंनी निवृत्ती घेतली आहे तर मारियो गोट्झे 23 जणांमध्ये स्थान शकला मिळवू नाही.
मॅन्युएल न्यूयर आणि मेसुथ ओझिल हे जर्मनीचे खेळाडू आताच दुखापतीतून सावरले आहेत. न्यूयर आणि ओझिलचा हा तिसरा विश्वचषक आहे. ओझिलने मागील दोन विश्वचषकातील 14 सामन्यात 2 गोल केले आहेत.
मेक्सिकोचा सेन्ट्रल डिफेंडर राफेल मारक्युझचा हा त्याचा पाचवा विश्वचषक खेळत आहे. त्याने विश्वचषकात एकूण 3 गोल केले असुन त्याच्या नावावर 15 आंतरराष्ट्रीय गोल आहेत.
मागच्याच वर्षी जर्मनीने फिफा कॉन्फिडरेशन कपच्या अंतिम सामन्यात चिलीला 1-0ने पराभूत केले. याच स्पर्धेत त्यांनी मेक्सिकोला 4-1ने हरवले होते.
विश्वचषकातील पहिल्या सामन्यात गोल करण्याची जर्मनीची सरासरी 3.5 आहे. 36 वर्षापूर्वी ते सुरूवातीचा सामना अल्जेरिया विरूद्ध हरले होते.
तसेच मेक्सिकोला 56 वर्ष लागले सुरूवातीचा सामना जिंकायला. 1986 मध्ये त्यांनी हा विजय मिळवला होता.