---Advertisement---

‘खरंच खूप सुंदर…’ लिओनल मेस्सीकडून वनताराचं कौतुक; पुन्हा भारतात येण्याचं दिलं वचन

On: गुरूवार, डिसेंबर 18, 2025 7:55 AM
---Advertisement---

जगप्रसिद्ध फुटबॉलर लिओनल मेस्सीच्या ‘GOAT टूर ऑफ इंडिया’दरम्यान भारतातील चार शहरांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या दौऱ्यानंतर मेस्सी गुजरातमधील जामनगर येथे असलेल्या ‘वनतारा’ या भव्य वन्यजीव बचाव, देखभाल आणि पुनर्वसन केंद्राला भेट देण्यासाठी पोहोचला. रिलायन्स इंडस्ट्रीज आणि रिलायन्स फाउंडेशनच्या पुढाकारातून उभारण्यात आलेल्या या केंद्रात मेसीने वन्यजीवांशी जवळून संवाद साधत खास अनुभव घेतला.

भारत दौऱ्याची सुरुवात मेसीने कोलकात्यापासून केली. त्यानंतर तो हैदराबाद, मुंबई आणि दिल्लीला गेला. प्रत्येक शहरात मेस्सीला पाहण्यासाठी चाहत्यांची मोठी गर्दी जमली होती. चाहत्यांच्या प्रचंड उत्साहानंतर, मेस्सी शांतता आणि निसर्गाच्या सान्निध्यात असलेल्या वनताराला पोहोचला. येथे त्याने भारतीय संस्कृती आणि परंपरांचा जवळून अनुभव घेतला.

वनतारामध्ये मेस्सीला भारतीय आध्यात्मिक परंपरांची ओळख करून देण्यात आली. तो मंदिरात गेला, शिवलिंगावर दूध अर्पण करून विधीवत पूजा केली. याशिवाय त्याने ध्यानसाधनाही केली. या आध्यात्मिक अनुभवाचा मेसीवर खोल प्रभाव पडल्याचे दिसून आले.

मेस्सी वनतारामध्ये असलेल्या विविध प्राण्यांसोबत भरपूर वेळ घालवला. हे केंद्र जखमी, संकटात सापडलेल्या आणि वाचवण्यात आलेल्या प्राण्यांच्या पुनर्वसन व आजीवन देखभालीसाठी ओळखले जाते. येथे मेस्सीने प्राण्यांच्या देखभालीची दिनचर्या जवळून पाहिली तसेच पशुवैद्यकीय कर्मचारी आणि काळजीवाहकांशी संवाद साधला.

वनतारामधील खास क्षण ठरला तो म्हणजे ‘माणेकलाल’ नावाच्या हत्तीच्या पिल्लासोबत मेसीने खेळलेला फुटबॉल. त्रिपुरामधून विशेष उपचारासाठी वनतारात आणण्यात आलेल्या या हत्तीच्या पिल्लाला फुटबॉलची विशेष आवड आहे. मेसीने त्याच्याकडे चेंडू फेकताच हत्तीही उत्साहात सहभागी झाला.

या भेटीनंतर मेसीने वनताराचे मनापासून कौतुक केले. “वनतारामध्ये प्राण्यांसाठी जे काम केले जाते ते खरोखरच सुंदर आहे. बचाव, उपचार आणि देखभालीची पद्धत अतिशय प्रभावी आहे. आम्ही येथे खूप छान वेळ घालवला आणि पुन्हा एकदा या प्रेरणादायी उपक्रमाला पाठिंबा देण्यासाठी नक्की येऊ,” असे मेस्सी सांगितले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---