पाचगणी । रवाईन हॉटेल यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एमएसएलटीए योनेक्स सनराईज रवाईन हॉटेल 14 वर्षाखालील राष्ट्रीय मानांकन टेनिस स्पर्धेत मुलींच्या गटात पहिल्या फेरीत महाराष्ट्राच्या अदिती लाखे, अलिशा देवगावकर, गौरी मानगावकर, दिया चौधरी, सलोनी परिदा, स्वरा काटकर, कायरा चेतनानी व सिया प्रसादे यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली.
पाचगणी येथील रवाईन हॉटेल येथील टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत मुलींच्या गटात पहिल्या फेरीत संघर्षपुर्ण लढतीत महाराष्ट्राच्या अदिती लाखेने गुजरातच्या प्रियांका राणाचा 7-5, 4-6, 7-6(7) असा टायब्रेकमध्ये पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली. अलिशा देवगावकरने महाराष्ट्राच्याच आनंदी भुतडाचा 4-6, 6-2, 6-0 असा पराभव केला.
महाराष्ट्राच्या जिया परेरा हिने कर्नाटकच्या कशिश कांतचा 6-2, 6-4 असा तर सिया प्रसादेने राजस्थानच्या गती वैष्णवचा 6-1, 6-0 असा सहज पराभव करत आगेकुच केली. महाराष्ट्राच्या कायरा चेतनानी हिने आपल्याच महाराष्ट्राच्याच एश्वर्या जाधवचा 7-6(2), 6-4 असा टायब्रेकमध्ये पराभव केला.
महाराष्ट्राच्या सलोनी परिदाने गुजरातच्या रिवा रावलानीचा 6-0, 6-1 असा तर स्वरा काटकरने महाराष्ट्राच्याच जेनिका जैसन हिचा 5-7, 6-1, 6-2 असा तीन सेटमध्ये पराभव केला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल- पहिली फेरी- 14 वर्षाखालील मुली
अस्मी वाधवा(गुजरात) वि.वि जुई काळे(महाराष्ट्र) 4-6, 7-5, 6-0
शताक्षी चौधरी(उत्तर प्रदेश) वि.वि आहना कौर(दिल्ली) 6-1, 6-4
अदिती लाखे(महाराष्ट्र) वि.वि प्रियांका राणा(गुजरात) 7-5, 4-6, 7-6(7)
अलिशा देवगावकर(महाराष्ट्र) वि.वि आनंदी भुतडा(महाराष्ट्र) 4-6, 6-2, 6-0
कनिष्का श्रीनाथ (कर्नाटक) वि.वि समृध्दी पोकर्ना (कर्नाटक) 6-2, 6-2
गौरी मानगावकर (महाराष्ट्र) वि.वि सानिया मोरे(महाराष्ट्र) 6-3, 6-4
दिया चौधरी(महाराष्ट्र) वि.वि कौशिकी समंथा(महाराष्ट्र) 6-3, 6-2
चेविका रेड्डी(तेलंगणा) वि.वि डेनीका फर्नांडो(महाराष्ट्र) 2-6, 6-2, 7-5
सलोनी परिदा(महाराष्ट्र) वि.वि रिवा रावलानी(गुजरात) 6-0, 6-1
जिया परेरा(महाराष्ट्र) वि.वि कशिश कांत(कर्नाटक) 6-2, 6-4
स्वरा काटकर(महाराष्ट्र) वि.वि जेनिका जैसन(महाराष्ट्र) 5-7, 6-1, 6-2
श्रीनिधी अमीरेड्डी(तेलंगणा) वि.वि आकृती सोनकुसरे(महाराष्ट्र) 6-4, 7-5
मिनाक्षी लवकुमार (कर्नाटक) वि.वि सिंजीनी मिथुन(कर्नाटक)6-4, 3-6, 6-4
कायरा चेतनानी(महाराष्ट्र) वि.वि एश्वर्या जाधव(महाराष्ट्र)7-6(2), 6-4
सिया प्रसादे(महाराष्ट्र) वि.वि प्रगती वैष्णव(राजस्थान)6-1, 6-0