पुणे, 6 जानेवारी 2024: सहाव्या सिटी प्रीमियर लीग (सीपीएल)2024 7- अ- साईड फुटबॉल स्पर्धेेत 350हून अधिक खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे. ही स्पर्धा मोशी येथील सिटी स्पोर्टस अरेना येथे 8 जानेवारी पासून सुरू होणार आहे.
सिटी एफसी पुणे यावर्षी आपले रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करत असून 2009मध्ये पुण्यात स्थापना करण्यात आली. याआधी 1999मध्ये अहमदनगर येथे सुरुवात करण्यात आली होती. स्पोर्टस फाऊंडेशन पुणे यांच्या मालकीच्या सिटी एफसी पुणे यांच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून 7 वर्षाखालील, 9वर्षाखालील, 11वर्षाखालील, 13 वर्षाखालील, 15 वर्षाखालील, आणि 17 वर्षावरील अशा सहा गटात होणार आहे. तसेच, ही स्पर्धा साखळी व बाद पद्धतीने खेळविण्यात येणार आहे. प्रत्येक गटात चार संघांचा समावेश करण्यात आला असून तीन सामने खेळणार आहेत. 13 वर्षाखालील गटात 8 संघांचा समावेश असून साखळी पद्धतीने खेळविण्यात येणार आहे.
अनोख्या प्रकारची स्पर्धा आठवड्याच्या शेवटी शनिवार व रविवार या दिवशी चार आठवडे रंगणार आहे. स्पर्धेचा अंतिम सामना 26 जानेवारी रोजी होणार आहे. स्पर्धेचे सामने 8,13,14,19,20 जानेवारी या दिवशी दररोज सात सामने खेळविण्यात येणार आहेत. स्पर्धेचा अंतिम सामना 26 व 27 जानेवारी रोजी होणार आहे.
शाळा आणि स्पर्धेत योग्य समन्वय साधता यावा, याहेतूने आठवड्याच्या शेवटी स्पर्धा आयोजित करण्यामागील संकल्पना आहे. तसेच, अकादमीतील प्रत्येक मुलाला सुरुवातीपासूनच स्पर्धात्मक वातावरणात खेळायला मिळेल याची आम्हाला खात्री असल्याचे स्पोर्टस फाऊंडेशन पूणेचे संस्थापक व अध्यक्ष शशांक कर्णिक यांनी सांगितले. स्पर्धेचे उदघाटन पिंपरी चिंचवडचे पोलीस उपायुक्त डॉ शिवाजी पवार यांच्या हस्ते होणार आहे.
महत्वाच्या बातम्या –
‘हे’ पाच खेळाडू आहेत गावसकरांचेही फेवरेट, पाकिस्तानी चाहत्याच्या प्रश्नावर दिग्गजाचे उत्तर
Afghanistan Squad: भारत दौऱ्यात प्रमुख अफगाणी खेळाडूंचे पुनरागम, टी-20 मालिकेसाठी ‘असा’ आहे संघ