भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील टी-20 मालिका गुरुवारी (11 जानेवारी) सुरू होणार आहे. मालिकेतील पहिला सामना मोहालीमध्ये आयोजित केला गेला आहे. या तीन सामन्यांच्या मालिकेसाठी अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने शनिवारी (6 जानेवारी) आपला 19 सदस्यीय संघ घोषित केला. नवनियुक्त कर्णधार राशिद खान आणि मुजीब उर रहमान यांचेही या सांघातून पुनरागमन होत आहे.
भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी राशिद खान (Rashid Khan) याला अफगाणिस्तान संघात निवडले गेले आहे. पण त्याच्या खेळण्याबाबत संशय कायम आहे. असात कर्णधारपदाची जबाबदारी इब्राहिम जादरान याच्या खांद्यावर सोपवली गेली आहे. नुकतेच जादरान याने यूएईविरुद्धच्या टी-20 सामन्यात कर्णधाराची भूमिका पार पाडली होती.
राशिद खान याची निकतीच कंबरेची शस्त्रक्रिया झाली. तो या दुखापतीतून अद्याप पूर्णपणे सावरला नाहीये. सध्या आफगाणिस्तानचा हा अष्टपैलू खेळाडू फिटनेस पुन्हा मिळवण्याच्या प्रयत्नात असला, तरी तो पाकिस्तानविरुद्ध खेळेल, याची खात्री देता याणार नाही. याच कारणास्तव त्याला भारत दौऱ्यात राखीव खेळाडूंमध्ये निवडले गेले आहे. अफगाणिस्तान संघ राशिदच्या अनुपस्थितीत बलाढ्य भारताचा सामना कशा पद्धतीने करणार, हे पाहण्यासारखे ठरेल.
काही दिवसांपूर्वीच राष्ट्रीय संघासोबतच्या करारामुळे चर्चेत राहिलेला मुजीब उर रहमान याचेही संघात पुनरगामन झाले. मुजीब यूएईविरुद्धच्या मालिकेत अफगाणिस्तान संघाचा भाग नव्हता. त्याचसोबत इकराम अलिखीत यालाही यष्टीरक्षक म्हणून संघात घेतले गेले आहे. अलिखीतला यूएईविरुद्धच्या मालिकेत राखीव खेळाडूंमध्ये ठेवले गेले होते. (Afghanistan squad announced for T20 series against India)
🚨 𝐒𝐐𝐔𝐀𝐃 𝐀𝐋𝐄𝐑𝐓! 🚨
AfghanAtalan Lineup revealed for the three-match T20I series against @BCCI. 🤩
More 👉: https://t.co/hMGh4OY0Pf | #AfghanAtalan | #INDvAFG pic.twitter.com/DqBGmpcIh4
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) January 6, 2024
भारत दौऱ्यासाठी निवडलेला अफगाणिस्तान संघ –
इब्राहिम झदरन (कर्णधार), रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), इक्रम अलीखिल (यष्टीरक्षक), हजरतुल्ला झाझाई, रहमत शाह, नजीबुल्ला झदरन, मोहम्मद नबी, करीम जनात, अजमतुल्ला ओमरझाई, शराफुद्दीन अश्रफ, मुजीब उर रहमान, फजलहक फारूकी, फरीद अहमद, नवीन -उल-हक, नूर अहमद, मोहम्मद सलीम, कैस अहमद, गुलबदिन नायब, राशिद खान.
महत्वाच्या बातम्या –
WTC 2023-25 । पराभव पाकिस्तानचा, पण नुकसान भारताचे, ऑस्ट्रेलिया गुणतालिकेत अव्वल स्थानी
मागच्या वर्षाप्रमाणे 2024 ची सुरुवात कमिन्ससाठी ठरली खास, पाकिस्तानला ‘व्हाईट वॉश’