---Advertisement---

‘डोकं लावत आहात…’, पत्रकाराच्या प्रश्नावर रोहितचं मजेशीर उत्तर, पुन्हा लुटली मैफील

On: शुक्रवार, जानेवारी 5, 2024 4:17 PM
---Advertisement---

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने पुन्हा एखदा पत्रकार परिषदेत मैफील लुटली. दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा कसोटी सामना भारताने 1-1 अशा बरोबरीत सोडवला. केपटाऊनमध्ये मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना भारताने 7 विकेट्सने जिंकला. या लो स्कोरिंग सामन्यात खेळपट्टी वेगवान गोलंदाजांसाठी बनवली गेली होती, ज्यामुळे रोहितने नाराजी व्यक्त केली. तसेच त्याच्या टी-20 कारकिर्दीबाबत विचारणा करणाऱ्या पत्रकाराला कर्णधाराकडून मजेशीर उत्तर देखील मिळाले.

केपाटाऊन कसोटीच्या पहिल्या डावात भारताने 156, तर दुसऱ्या डावात अवघ्या 12 षटकात 79 धावांचे लक्ष्य गाढले. तत्पूर्वी दक्षिण आफ्रिका संघ पहिल्या डावात 55, तर दुसऱ्या डावात 176 धावा करून सर्वबाद झाला होता. केपटाऊनमधील खेळपट्टीवर फलंदाजांना धावा करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. याच पार्श्वभूमीवर अनेकांनी या खेलपट्टीवर प्रश्न उपस्थित केले. भारतीय खेळपट्टी फिरकी गोलंदाजीसाठी अनुकूल असल्यामुळे नेहमीच विदेशी खेळाडू आणि जाणाकारांकडून त्यावर टीका केली गेली आहे. कर्णधार रोहिने शर्मा (Rohit Sharma) याच पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेत भारतीय खेळपट्टीवर टीका करणाऱ्या सर्वांना निशाणा साधला.

भारताला आपली पुढची मालिका मायदेशात अफगाणिस्ताविरुद्ध टी-20 फॉरमॅटमध्ये खेळायची आहे. 11 जानेवारी रोजी सुरू होणाऱ्या या मालिकेतून रोहित टी-20 क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार, असे सांगितले जात आहे. असे असले तरी, कर्णधार रोहितने याविषयी कुठलीच प्रतिक्रिया पत्रकार परिषदेत दिली नाही. त्याला प्रश्न विचारला गेला की, “रोहित तू सध्या अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेवर लक्ष देत आहे, की इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेचा आतापासूनच विचार डोक्यात आहे?”

पत्रकराने या प्रश्नातून रोहितच्या टी-20 कारकिर्दीबाबत एकप्रकारे स्पष्टीकरण मागितले होते. पण कर्णधाराने चालाकीने याचे उत्तर दिले. रोहित म्हणाला, “डोकं लावत आहात तुम्हा… मी यावर काही बोलणार नाही. सध्या आपण केपटाऊन कसोटीबाबत बोलू.” रोहितच्या उत्तराची सध्या सोशल मीडियावर चांगलाची चर्चा होताना दिसत आहे. चाहत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया यावर येत आहेत.

दरम्यान, केपटाऊनमध्ये रोहितच्या नेतृत्वात भारतीय संघाने जिंकलेला सामना ऐतिहासिक ठरला. कारण याआधी केपटाऊनमध्ये भारताला एकही कसोटी सामना जिंकता आला नाही. त्याचसोबत अवघ्या दीड दिवसात निकाली निखालेला हा कसोटी क्रिकेटमधील सर्वात छोटा (चेंडूंच्या बाबतीत) सामनाही ठरला. भारताला आपली पुढची टी-20 मालिका 11 जानेवारीपासून मायदेशात अफगाणिस्तानविरुद्ध खेळायची आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार विराट कोहली आणि रोहित शर्मा या मालिकेत खेळताना दिसू शकतात. मागच्या एका वर्षापासून हे दोन्ही दिग्गज टी-20 क्रिकेटपासून दूर आहेत.  (Rohit Sharma’s Funny Answer in Journalist Media)

महत्वाच्या बातम्या – 
Ranji Trophy: बिहारच्या युवा क्रिकेटपटूने रचला इतिहास, सचिन तेंडुलकरपेक्षा कमी वयात केले रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पण
‘जर असं झालं तर मी निवृत्ती घेईन…,’ ऑस्ट्रेलियन दिग्गज खेळाडूचं धक्कादायक विधान 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---