रांची। आज(22 ऑक्टोबर) भारताने दक्षिण आफ्रिके विरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्यात 1 डाव आणि 202 धावांनी विजय मिळवला आहे. या विजयाबरोबरच भारताने 3 सामन्यांची कसोटी मालिका 3-0 अशा फरकाने जिंकली आणि दक्षिण आफ्रिकेला व्हाईटवॉश दिला.
जेएससीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टे़डीयम, रांची येथे झालेल्या तिसऱ्या कसोटीदरम्यान आज भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी स्टेडीयममध्ये उपस्थित होता. तसेच त्याने भारताच्या ड्रेसिंग रुममध्येही हजेरी लावल्याचे दिसून आले आहे.
बीसीसीआयने त्याचा शहाबाज नदीमबरोबर चर्चा करतानाचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
Look who's here ???? pic.twitter.com/whS24IK4Ir
— BCCI (@BCCI) October 22, 2019
धोनी आणि नदीम हे देशांतर्गत क्रिकेटमध्ये झारखंडकडून एकत्र खेळले आहेत. नदीमने याच कसोटी सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. त्याने या सामन्यात मिळून 4 विकेट्स घेतल्या आहेत.
धोनी क्रिकेटपासून मागील काही महिने दूर आहे. तो भारताकडून शेवटचे 2019 च्या विश्वचषकातील उपांत्य सामन्यात न्यूझीलंड विरुद्ध खेळला आहे.
Great to see a true Indian legend in his den after a fantastic series win #Dhoni #TeamIndia #INDvsSA pic.twitter.com/P1XKR0iobZ
— Ravi Shastri (@RaviShastriOfc) October 22, 2019
Mahendra Singh Dhoni Finished off in his Style ????????!! #INDVSA pic.twitter.com/Mri8NsPZOi
— ???????????????????? (@Vidyadhar_R) October 22, 2019






