मंगळवारी(9 एप्रिल) आयपीएल 2019 मध्ये झालेल्या 23 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने घरच्या मैदानावर कोलकता नाईट रायडर्स विरुद्ध 7 विकेट्सने विजय मिळवला. हा चेन्नईचा या मोसमातील 5 वा विजय ठरला आहे. त्याचबरोबर त्यांनी सध्या गुणतालिकेत अव्वल क्रमांकही पटकावला आहे.
या सामन्यानंतर आता चेन्नईचा सामना लगेचच उद्या(11 एप्रिल) राजस्थान रॉयल्स विरुद्ध जयपूर येथे होणार आहे. त्यामुळे आज(10 एप्रिल) सकाळीच चेन्नईचा संघ जयपूरला रवाना झाला.
त्यामुळे मंगळवारी जवळजवळ मध्यरात्री संपलेल्या सामन्यानंतर लगेचच आज सकाळी प्रवास करावा लागल्याने खेळाडूंना विश्रांतीसाठी कमी वेळ मिळाला आहे. त्यामुळे सकाळी फ्लाईटची वाट पाहत धोनीने विमानतळावरच झोप घेतली आहे. यावेळी धोनीबरोबर विमानतळावर त्याची पत्नी साक्षी देखील विश्रांती घेताना दिसली आहे.
याचा फोटो धोनीने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. तसेच या फोटोला कॅप्शन देताना त्याने लिहीले आहे की ‘आयपीएलच्या वेळेची सवय झाली की सकाळची फ्लाईट असेल तर असे होते.’
या फोटोमध्ये धोनी आणि साक्षी एकच बॅग उशाला घेउन विमानतळावर विश्रांती घेत असल्याचे दिसत आहे. तसेच या फोटोवर अनेक चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत, त्याचबरोबर हा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
https://www.instagram.com/p/BwD9VVXFdJt/
After getting used to IPL timing this is what happens if u have a morning flight https://t.co/3zWrBEWYob
— Mahendra Singh Dhoni (@msdhoni) April 10, 2019
मंगळवारी कोलकता विरुद्ध झालेल्या सामन्यात चेन्नईच्या गोलंदाजानी केलेल्या भेदक गोलंदाजीमुळे कोलकताला 20 षटकात 9 बाद 108 धावाच करता आल्या. कोलकताकडून आंद्रे रसलने 44 चेंडूत 50 धावांची खेळी केली. तर चेन्नईकडून दीपक चहरने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. तसेच हरभजन आणि ताहीरने प्रत्येकी दोन आणि रविंद्र जडेजाने 1 विकेट घेतली.
कोलकताने दिलेल्या 109 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईकडून फाफ डुप्लेसिसने नाबाद 43 धावा करत चेन्नईला 7 विकेट्सने विजय मिळवून दिला. कोलकताकडून सुनील नारायणने 2 आणि पियूष चावलाने 1 विकेट घेतली.
महत्त्वाच्या बातम्या –
–आज हा खेळाडू करणार मुंबई इंडियन्सचे नेतृत्व, असा आहे ११ जणांचा संघ
–धोनीबरोबर टेबल टेनिस खेळण्याचा या खेळाडूला झाला फायदा!
–एमएस धोनीने केलेल्या स्टम्पिंगवर इम्रान ताहीरने असे केले सेलिब्रेशन, पहा व्हिडिओ