चेन्नई। चेन्नई सुुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनी हा त्याच्या चपळ यष्टीरक्षणामुळे नेहेमीच चर्चेत असतो. त्याचे हे चपळ यष्टीरक्षण आयपीएलमध्ये मंगळवारी(9 एप्रिल) चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध कोलकता नाईट रायडर्स संघात पार पडलेल्या सामन्यातही पहायला मिळाले.
त्याने या सामन्यात कोलकता नाईट रायडर्सचा फलंदाज शुबमन गिलला 11 व्या षटकात इम्रान ताहीरच्या गोलंदाजीवर यष्टीचीत केले. त्यावेळी ताहीरने जोरदार सेलिब्रेशन केले. याचा व्हिडिओ आयपीएलने अधिकृत वेबसाईटवर शेअर केला आहे. या व्हिडिओला त्यानी ब्रोडबँड इंटरनेटपेक्षाही जलद एमएस धोनी? असे कॅप्शन दिले आहे.
11 व्या षटकात इम्रान ताहिरने टाकलेल्या पहिल्याच चेंडू गुगली टाकला. त्यावर गिलने फ्लिक मारण्याचा प्रयत्न केला. पण धोनीने चपळतेने चेंडू पकडत गिल क्रिजमध्ये परतण्याआधीच यष्टीचीत केले होते.
विशेष म्हणजे धोनीने यष्टीचीत करण्याआधीच ताहीरने या विकेटचे सेलिब्रेशन करायला सुरुवात केली होती. याबद्दल जेव्हा सामन्यानंतर हर्षा भोगले यांनी धोनीला प्रश्न विचारला तेव्हा धोनी हसून म्हणाला त्याचा माझ्यावर तेवढा विश्वास असेल.
https://twitter.com/Vidshots1/status/1115645877429784576
गिलला बाद केल्यानंतर 16 व्या षटकात हरभजन सिंगच्या गोलंदाजीवरही धोनीने कोलकताच्या पियूष चावलालाही यष्टीचीत केले.
या सामन्यात चेन्नईच्या गोलंदाजानी केलेल्या भेदक गोलंदाजीमुळे कोलकताला 20 षटकात 9 बाद 108 धावाच करता आल्या. कोलकताकडून आंद्रे रसलने 44 चेंडूत 50 धावांची खेळी केली. तर चेन्नईकडून दीपक चहरने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. तसेच हरभजन आणि ताहीरने प्रत्येकी दोन आणि रविंद्र जडेजाने 1 विकेट घेतली.
कोलकताने दिलेल्या 109 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईकडून फाफ डुप्लेसिसने नाबाद 43 धावा करत चेन्नईला 7 विकेट्सने विजय मिळवून दिला. कोलकताकडून सुनील नारायणने 2 आणि पियूष चावलाने 1 विकेट घेतली.
हा चेन्नईचा या मोसमातील 6 सामन्यातील 5 वा विजय असून चेन्नई 10 गुणांसह सध्या गुणतालिकेत अव्वल क्रमांकावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
–रोहितच्या अनुपस्थितीत हे खेळाडू करु शकतात मुंबई इंडियन्सचे नेतृत्व
–‘यूनिवर्स बॉस’ ख्रिस गेलने चाहत्यांबरोबर असा साजरा केला विजयाचा आनंद, पहा व्हिडिओ






