---Advertisement---

बरोबर १ वर्षापुर्वी कोहलीने केलेला तो पराक्रम विसरणे केवळ अवघड

On: गुरूवार, ऑक्टोबर 24, 2019 6:17 PM
---Advertisement---

विशाखापट्टनमध्ये येथे २४ ऑक्टोबर २०१८ रोजी झालेल्या भारत विरुद्ध विंडीज वन-डे सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने दीडशतकी खेळी करताना वन-डे कारकिर्दीत १० हजार धावांचा टप्पा पार केला.

विराटच्या १० हजार धावांची चर्चा ही सचिनने केलेल्या १० हजार धावांइतकीच झाली होती. त्यामुळे जेव्हा सचिनने १० हजार धावा केल्या होत्या तेव्हा काय काय घडले होते याची जोरदार चर्चा झाली होती.

परंतु विराटने हा पराक्रम करताना सचिनपेक्षा ५४ डाव कमी खेळले होते.

-वन-डेत कमी डावात १० हजार धावा करण्याचा विक्रम आता विराटच्या नावावर. यापुर्वी हा विक्रम सचिनच्या नावावर होता. 

२०५- विराट कोहली, २०१८

२५९- सचिन तेंडूलकर, २००१

अशा या सामन्यात अनेक योगायोग घडले होते. त्यातील काही निवडक योगायोग

काय आहेत ते खास योगायोग- 

१. सचिनने ३१ मार्च २००१ रोजी आॅस्ट्रेलियाविरुद्ध १२५ चेंडूत १३९ धावा करत १० हजार धावांचा टप्पा गाठला होता. तर विराटनेही १२९ चेंडूत नाबाद १५१ धावा करत १० हजार धावांचा टप्पा गाठला. १० हजार धावा करताना शतकी खेळी करणारे विराट आणि सचिन हे दोनच खेळाडू आहेत.

२. जेव्हा सचिनने १० हजार धावांचा टप्पा पार केला होता त्या सामन्यात सचिनला सामनावीर पुरस्कार देण्यात आला होता. तर विशाखापट्टनमच्या सामन्यात विराटलाही सामनावीर पुरस्कार देण्यात आला होता.

३. सचिन आणि विराट दोघांनीही १० हजार धावांचा टप्पा भारतातच पार केला. सचिनने हा टप्पा इंदोरला तर विराटने विशाखापट्टनमला पार केला.

४. जेव्हा सचिनने १० हजार धावांचा टप्पा पार केला तेव्हा कमी डावात १० हजार धावा करणारा तसेच वन-डेत १० हजार धावा करणारा तो पहिला खेळाडू होता. तर विराटने जेव्हा हा टप्पा पार केला तेव्हा कमी डावात अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिला खेळाडू ठरला.

५. सचिनने ज्या मैदानावर १० हजार धावा केल्या त्याच मैदानावर विराटला ही कामगिरी करण्याची संधी होती. परंतु हा सामना इंदोरवरुन विशाखापट्टनमला काही कारणास्तव हलविण्यात आला होता.

६. सचिनने जेव्हा १० हजार धावांचा टप्पा पार केला होता तेव्हा त्याची वन-डेतील सर्वोत्तम धावसंख्या नाबाद १८६ होती तर विराटने जेव्हा हा टप्पा पार केला तेव्हा त्याची धावसंख्या १८३ होती.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---